Devendra Fadnavis: ठाकरे बंधू अन् पवार काका-पुतण्या एकत्र येणार? CM फडणवीसांचं थोडक्यात उत्तर...

Devendra Fadnavis on Raj-Uddhav Alliance: काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलंय.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSaam Tv
Published On

राज्यातील राजकारणात मोठी उलटफेर होणार असल्याचं संकेत दिसत आहेत. राजकारणातील दोन मोठी कुटुंब एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. राज ठाकरेंनी साद घातल्यानंतर उद्धव ठाकरेंनीही टाळी देण्याची इच्छा व्यक्त केली. तर दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यावरून भाजपची धकधक वाढलीय का? भाजपला काही अडचण निर्माण होणार का? असा सवाल केला जातोय. या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात उत्तर दिलंय.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधू आणि काका-पुतण्या यांच्या एकत्र येण्यावर भाष्य केलंय.ही राजकीय घडामोड होणं शक्य आहे का? असा सवाल मुख्यमंत्र्यांना करण्यात आला होता. दोन-तीन दिवसापूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांना एकत्र येण्याची साद घातली होती. तर दुसरीकडे अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटी वाढल्या आहेत. त्यामुळे या राजकीय घडामोडी होत असल्याचं तुम्हाला दिसतंय का?

Devendra Fadnavis
Mahayuti: महायुतीत धुसफूस; युतीत राहायचं तर राहा, नाहीतर बाहेर पडा, भाजपचा शिंदे सेनेला इशारा

या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जर परिवार एकत्र येत असतील तर त्याची आम्हाला अडचण नाही, त्यांनी नक्कीच एकत्रित यावं. आम्ही त्या निर्णयाचं स्वागत करू. याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी असं होणार नसल्याचं देखील म्हटलंय. माध्यमे फार जास्त ऐकतात. फार जास्त विचार करतात, फार जास्त संदर्भ काढतात.

दोन वाक्यांमधील अर्थ काढतात तो फार पुढचा विचार असतो. पण आतातरी तशी कोणतीच परिस्थिती नाहीये. ज्यांनी साद घातली ज्यांनी प्रतिसाद दिला. तेच लोक एकत्र येण्याबाबत जास्त सांगू शकतील.

Devendra Fadnavis
Uddhav-Raj Thackeray Alliance: ठाकरे बंधुंची परदेशवारी; राज ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंचा परदेश दौरा, परदेशात होणार युतीचा निर्णय?

दोघे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं असताना शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटी वाढल्या आहेत. त्यामुळं दोन्ही नेते पुन्हा एकत्र येणार असल्याच्याही चर्चा सुरू झालीय. गेल्या काही वर्षात राज्याच्या राजकारणात अनेक उलटफेर झालेत. त्यावरून किमान महाराष्ट्राच्या राजकारणात काहीच अशक्य नाही असं म्हटलं जातं.

राज्यातील चार प्रमुख पक्षांपैकी दोन पक्ष फुटले. शिवसेनेत फुटून दोन गट पडले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली आणि दोन गट पडले. त्यामुळं यापुढील काळात राजकारणात काहीही होऊ शकतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com