Uddhav Thackeray: संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का, बड्या नेत्याने सोडली साथ; धनुष्यबाण घेणार हाती

Kishanchand Tejwani will join shinde group: किशनचंद तनवाणी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत १०० पेक्षा जास्त आजी-माजी पदाधिकारी शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत.
Uddhav Thackeray
Eknath Shinde Vs Uddhav ThackeraySaam TV
Published On

माधव सावरगावे, संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण या सभेपूर्वीच छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. माजी आमदार आणि जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केलाय. किशनचंद तनवाणी यांच्यासोबत १०० पेक्षा जास्त आजी-माजी पदाधिकारी शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. विधानसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर जिल्हाप्रमुख पदावरून हटविलेले माजी आमदार किशनचंद तनवाणी हे नाराज होते. अखेर किशनचंद तनवाणी यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला. थोड्याच वेळात ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. यावेळी आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे.

Uddhav Thackeray
Maharashtra politics : बारामतीची सुभेदारी कोणाकडे? मुलीनंतर नातवासाठी पवारांची फिल्डिंग, उद्विग्न दादांचा काकांना सवाल

'आम्ही अडीच वर्ष अगोदर केलेलं काम आज तनवाणी यांनी केलं, बाळासाहेबांचे विचार समोर घेऊन जात आहोत. ते देखील आम्हाला या कार्यात मदत करतील.', असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. एमआयएमचे उमेदवार निवडून येऊ नये म्हणून मी उमेदवारी मागे घेतली आणि आता शिंदे गटात प्रवेश करत असल्याची माहिती किशनचंद तनवाणी यांनी यावेळी दिली. किशनचंद तनवाणी यांनी प्रवेश केल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी शिंदे गटाची ताकद वाढली आहे.

Uddhav Thackeray
Maharashtra politics :आधी बॅगा आता कारची तपासणी, उद्धव ठाकरेंच्या तपासणीवरुन राजकारण शिगेला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com