
छत्रपती संभाजीनगरच्या हडको परिसरातून धक्कादायक बातमी समोर.
नर्सचा बाथरूममध्ये संशयास्पद मृतदेह आढळला.
कुटुंबाला वेगळाच संशय.
माधव सावरगावे, साम टिव्ही
छत्रपती संभाजीनगरच्या हडको येथून धक्कादायक बातमी समोर येत आहे. एम्स रूग्णालयात दोन महिन्यांपूर्वी नोकरीस लागलेल्या नर्सचा बाथरूममध्ये मृतदेह आढळला. धक्कादायक म्हणजे मृतदेहाशेजारी इंजेक्शन आढळून आले आहे. त्यामुळे हत्या आहे की आत्महत्या? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत अधिक तपास सिडको पोलीस करीत आहेत.
हर्षदा पद्माकर तायडे (वय वर्ष २५) असे मृत नर्सचे नाव आहे. तिने नर्सिंगचे शिक्षण पूर्ण केले. दोन महिन्यांपासून या रूग्णालयात कार्यरत आहे. घटनेच्या दिवशी (रविवारी) ती नोकरीसाठी (रूग्णालयात) नियमितपणे गेली होती. काही वेळानंतर हर्षदा रूग्णालयात दिसली नाही. त्यामुळे सहकार्यांनी तिच्या कॉल लावला.
तेव्हा तिनं स्वच्छतागृहात असल्याचं सांगितलं. यानंतर सहकाऱ्यांनी स्वच्छतागृहात धाव घेतली. मात्र, ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. हर्षदाच्या हातावर इंजेक्शनचे व्रण आढळून आले. यानंतर तिला तातडीनं दुसऱ्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी मात्र तपासून तरूणीला मृत घोषित केले.
हर्षदाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाची माहिती सिडको पोलिसांना मिळताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक निवृ्त्ती गायके , सहाय्यक फौजदार राठोड यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली.
याप्रकरणी आक्सिमक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी हर्षदाच्या कुटुंबाला घातपाताचा संशय आहे. रूग्णालयाकडून हर्षदाने इंजेक्शन घेतल्यामुळे तिचा मृत्यू झाला, असा संशय त्यांनी व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.