Chhatrapati Sambhajinagar : भोवळ आली अन् दुचाकीवरून पडली; पैसे काढण्यासाठी गेलेल्या 'लाडक्या बहिणी'चा अपघाती मृत्यू

Woman Death Due To falling from bike : छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी गेलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. या महिलेचा अपघाती मृत्यू झालाय.
'लाडक्या बहिणी'चा अपघाती मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar newsSaam Tv
Published On

रामनाथ ढाकणे, साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढून परतत असताना एका महिलेचा अपघाती मृत्यू झालाय. चालत्या दुचाकीवर भोवळ आल्यामुळे ही महिला खाली पडली होती. घरी पोचण्याआधीच लाडक्या बहिणीचा मृत्यू झाल्यामुळे पाचोड गावावर मोठी शोककळा पसरली आहे. काल २७ ऑगस्ट रोजी ही धक्कादायक घडलेली आहे. आपण या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेवू या.

'लाडक्या बहिणी'चा अपघाती मृत्यू

याबाबत सविस्तर वृत्त असं की, अंब़ड तालुक्यातील पार्वती जनार्दन बनसोडे नावाची महिला २७ ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये गेली होती. बॅंकेतून पैसे काढून परतत असताना (ladki bahin yojana) काळाने त्यांच्यावर घाला घातल्याचं समोर आलंय. पैसे काढून परतत असताना ही महिला भोवळ आल्यामुळे दुचाकीवरून पडली.

भोवळ आली अन् दुचाकीवरून पडली

अपघातात रस्त्यावर पडल्याने गंभीर मार लागला होता, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला (Chhatrapati Sambhajinagar) होता. अपघातानंतर तातडीने या महिलेला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु डॉक्टरांनी या महिलेला तपासून २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी मृत घोषित केलं. या घटनेमुळे पाचोड गावात हळहळ व्यक्त करण्यात येत (Accident News) आहे. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला होता. कुटुंबावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

'लाडक्या बहिणी'चा अपघाती मृत्यू
Nashik Accident: रात्रीच्या अंधारात थेट खड्ड्यात कोसळला; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, थरार CCTVत कैद

छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

लाडकी बहीण योजनेचे पैसे काढून गावाकडे परत जात असताना सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर चालत्या दुचाकीवर भोवळ आल्याने महिला रस्त्यावर पडली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली (Chhatrapati Sambhajinagar news) आहे. पार्वती यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे काढले खरे परंतु घरीपोहोचण्याअगोदरच त्यांचा मृत्यू झाला. ठिकठिकाणी बॅंकांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.

'लाडक्या बहिणी'चा अपघाती मृत्यू
Ulhasnagar Accident : भयंकर! भरधाव ट्रकने ५ रिक्षा, ३ दुचाकी उडवल्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेचा CCTV VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com