Snake Bite Death: १३ वर्षाच्या मुलीला विषारी सापाने केला झोपेत दंश, संभाजीनगरमध्ये हळहळ

Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कर्णपुरा भागात झोपेत असताना विषारी साप चावल्याने १३ वर्षीय वैष्णवी पवार हिचा मृत्यू झाला. उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले असता तीचा मृत्यू झाला.
Snake Bite Death: १३ वर्षाच्या मुलीला विषारी सापाने केला झोपेत दंश, संभाजीनगरमध्ये हळहळ
SambhajinagarSaam Tv
Published On
Summary
  • कर्णपुरा भागात झोपेत असताना १३ वर्षीय वैष्णवीला साप चावल्याने मृत्यू.

  • तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केल्यावरही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

  • पावसाळ्यात ग्रामीण व उपनगर भागात साप चावल्याच्या घटनांत वाढ.

  • नागरिकांकडून सुरक्षिततेच्या उपाययोजनांची मागणी.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कर्णपुरा भागात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हळहळला आहे. झोपेत असताना विषारी साप चावल्याने 13 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. वैष्णवी अखिलेश पवार असे मृत मुलीचे नाव आहे. वैष्णवीचे वडील हे बांधकाम मजूर आहे. तिच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नेमकं काय घडलं ?

मध्यरात्री दोनच्या सुमारास वैष्णवी नेहमीप्रमाणे अंथरुणावर झोपलेली असताना अचानक विषारी सापाने खोलीत शिरकाव केला आणि वैष्णवीच्या चावा घेतला. चाव्याचा वेदनादायक अनुभव जाणवताच ती घाबरून रडू लागली. घरच्यांनी तातडीने काय घडले ते समजून घेतले आणि तिच्या पायावर सापाने चावा घेतल्याचे दिसताच मोठा गोंधळ उडाला. तिचे वडील आणि आई तिला तातडीने छत्रपती संभाजी नगर येथील घाटी रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, विषाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढल्यामुळे वैद्यकीय उपचार सुरू असतानाच वैष्णवीचा मृत्यू झाला.

Snake Bite Death: १३ वर्षाच्या मुलीला विषारी सापाने केला झोपेत दंश, संभाजीनगरमध्ये हळहळ
Sambhajinagar : मोबाईलसाठी हट्ट; आईने नकार दिल्याने मुलाने घेतली डोंगरावरून उडी

ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. परिसरात साप चावल्याच्या घटना वारंवार होत असल्याने नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडे प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांत ग्रामीण व उपनगर भागात साप घरात शिरण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढतात. त्यामुळे नागरिक सतत भीतीच्या छायेत जगतात.

Snake Bite Death: १३ वर्षाच्या मुलीला विषारी सापाने केला झोपेत दंश, संभाजीनगरमध्ये हळहळ
Sambhajinagr News | Sambhajinagar मध्ये NCP कडून जाहीर निषेध !

या घटनेनंतर आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. साप चावल्यावर तातडीने प्राथमिक उपचार कसे करावेत याबाबत जनजागृती मोहीम राबवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com