Nath Shashti Festival 2024: नाथनगरी दुमदुमली! पैठणच्या नाथ षष्ठी सोहळ्यास सुरवात; गोदातीरी भाविकांचा महापूर

Sant Eknath Maharaj Nath Shashti Sohala: एकनाथ महाराज यांच्या नाथ षष्ठी सोहळ्यानिमित्त शेकडो भाविक आपल्या पालख्यांसह पैठणमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे भानुदास एकनाथच्या गजरात पैठण नगरी अगदी दुमदुमून गेली आहे.
Sant Eknath Maharaj Nath Shashti Sohala:
Sant Eknath Maharaj Nath Shashti Sohala:Saamtv
Published On

राम ढाकणे, छत्रपती संभाजीनगर|ता. ३१ मार्च २०२४

Chhatrapati Sambhajinagar News:

भारताची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पैठणमध्ये आजपासून सुरू झालेल्या श्री संत एकनाथ महाराज यांच्या नाथ षष्ठी सोहळ्यानिमित्त शेकडो भाविक आपल्या पालख्यांसह पैठणमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे भानुदास एकनाथच्या गजरात पैठण नगरी अगदी दुमदुमून गेली आहे.

भारताची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पैठणमध्ये आजपासून सुरू झालेल्या श्री संत एकनाथ महाराज यांच्या नाथ षष्ठी सोहळ्यानिमित्त शेकडो भाविक आपल्या पालख्यांसह पैठणमध्ये दाखल झाले आहेत. भानुदास एकनाथचा जयघोष करत आणि टाळ मृदंगाच्या गजरात आज पैठण गोदावरी नदीच्या तिरावर भाविकांचा महापूर दिसून आला.

पंढरपूरनंतर सर्वात मोठा सोहळा राज्याच्या कानाकोपऱ्यातून आज मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष भाविक नाथांच्या नगरीत तल्लीन झाल्याचं पहायला मिळाले. संत एकनाथ महाराजाच्या वाड्यात 12 वर्ष पांडुरंगाने पाणी वाहिले तो पवित्र रांजण भरल्यानंतर नाथषष्ठी सोहळ्याच्या पर्वाला सुरुवात झाली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sant Eknath Maharaj Nath Shashti Sohala:
Mumbai Crime News: मुंबई हादरली! 15 वर्षीय मुलीवर कॅब चालकाकडून अत्याचार

यावेळी मोठया संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. त्यानंतर पारंपारिक पद्धतीने नाथषष्ठीला आजपासून सुरुवात झाली असून गोदावरी नदीच्या तिरावर विविध मठावर आणि उद्यान परिसरात दिंड्या मुक्कामी आहेत. पुढील तीन दिवस हा नाथषष्ठी सोहळा सुरू असेल. दरम्यान या नाथ षष्ठी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकरी आणि भाविकांसाठी एसटी महामंडळाकडून 325 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

Sant Eknath Maharaj Nath Shashti Sohala:
Bhandara Accident : भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; पती-पत्नी ठार, घटनेनं अख्खं गाव हळहळलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com