माधव सावरगावे, साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगरच्या घाटी हॉस्पिटल कॉलेजमध्ये रँगिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कनिष्ठ विद्यार्थ्यांची रॅगिंग केल्याप्रकरणी घाटी रुग्णालयातील तीन वरिष्ठ विद्यार्थ्यांना सहा महिन्यांसाठी निलंबित केलं आहे. त्याचबरोबर त्यांना २५ हजार रुपये दंड अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी केला आहे. या प्रकारामुळे महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांमध्ये देखील भीतीचं वातावरण आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय म्हणजे घाटीच्या एमबीबीएसच्या तृतीय वर्षातील सहा विद्यार्थी द्वितीय वर्षातील सहा विद्यार्थ्यांना चहा, कॉफी, नाष्टा, सिगारेट आणायला सांगून त्रास देत होते.हा प्रकार गेल्या ३ महिन्यांपासून सुरू (Ragging In Ghati Hospital College) होता. शनिवारी रात्री द्वितीय वर्षातील एका विद्यार्थ्याने तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचे काम ऐकले नाही.
त्यामुळे (Chhatrapati Sambhajinagar) त्यातील एका विद्यार्थ्याने त्याची कॉलर पकडली आणि शिवीगाळ केली. या प्रकारामुळे चिडलेल्या विद्यार्थ्याने वडिलांना ही माहिती कळवली. वडिलांनी रुग्णालय प्रशासन आणि अँटी रॅगिंग कमिटीकडे यासंदर्भात तक्रार केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कमिटीने तातडीने बैठक घेऊन तक्रारीनुसार चौकशी केली. या चौकशीअंती रॅगिंग झाल्याचं स्पष्ट झालं.
समितीच्या अहवालानंतर अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी याप्रकरणी नॅशनल मेडिकल कौन्सिलच्या (एनएमसी) नियमानुसार कारवाई केली (Ghati Hospital College) आहे. रॅगिंग करणाऱ्या या तीन विद्यार्थ्यांना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी हॉस्पिटल कॉलेजमध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. रॅगिंग करणं कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे याप्रकरणी रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली (Chhatrapati Sambhajinagar News) आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.