Sambhajinagar News: चालकांसह स्कूलबस द्या, शिक्षणाधिकाऱ्यांचा शाळांना फतवा

School Bus For Government Program: संभाजीनगरमध्ये महिला सक्षमीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला महिलांना मोठ्यासंख्येने येता यावे यासाठी शाळांनी आपल्या स्कूल बस द्याव्यात असा फतवा शिक्षणाधिकाऱ्यांनी काढला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
Sambhajinagar News: चालकांसह स्कूलबस द्या, शिक्षणाधिकाऱ्यांचा शाळांना फतवा
School Bus For Government Program Saam Tv
Published On

माधव सावरगावे, संभाजीनगर

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी ६ ऑक्टोबर रोजी महिला सक्षमीकरण कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला स्कूलबस उपलब्ध करून द्या, असा फतवा शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांच्या नावे काढला आहे. चालकांसह स्कूल बस देण्याचे निर्देशही या फतव्यात देण्यात आले आहेत. त्यामुळे शैक्षणिक वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शासनांच्या योजनांसाठी आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमांसाठी एसटी महामंडळाच्या सेवेचा लाभ घेतला जायचा. परंतू आता शाळांना वेठिस धरल्यामुळे शासनाच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य शासनातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत ६ ऑक्टोबर रोजी शहरात महिला सशक्तीकरण मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर हा मेळावा होणार आहे. कार्यक्रमाला महिलांना उपस्थित राहता यावे यासाठी शाळांना बस उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, अरुणा भुमकर यांच्या स्वाक्षरीचे पत्र सर्व मुख्याध्यापकांना पाठविण्यात आले आहे. वाहनचालकासह बस उपलब्ध करून देण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे निर्देश आहेत. शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आलेले हे पत्र आता चर्चेचा विषय ठरले आहे.

Sambhajinagar News: चालकांसह स्कूलबस द्या, शिक्षणाधिकाऱ्यांचा शाळांना फतवा
Sambhajinagar News : सीसीटीव्ही असेल तरच परीक्षा केंद्र कायम; सीबीएसईच्या धर्तीवर राज्य मंडळाचे धोरण

शिक्षणाधिकारी प्रशासनाच्या निर्देशामुळे शाळा व्यवस्थापनाची चांगलीच धावपळ उडाली आहे. पूर्वी एसटी महामंडळाचा आधार घेतला जात होता, आता शाळांच्या बसेस उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. त्यात शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्रात इंधन खर्चाबाबत उल्लेख नाही. त्यामुळे इंधन खर्चाचा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शाळांची संख्या साडेचार हजारांवर आहे. त्यापैकी परिवहन विभागाकडे परिवहन समितीबाबत नोंद असलेल्या शाळांची संख्या सुमारे १९०० आहे. ज्या शाळांकडे स्वत:च्या स्कूल बस आहेत. त्यापैकी ३०० पैकी अधिक बसेस उपलब्ध होतील, असेही अधिकारी सुत्रांनी सांगितले. ६ ऑक्टोबर रोजी रविवार असल्याने त्या दिवशी शाळांना सुट्टी आहे, परंतु असे असले तरी शाळांच्या बसेस कशा उपलब्ध करून देणार, असा प्रश्न शाळा व्यवस्थापनाला पडल्याचे बोलले जात आहे.

शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्रात काय म्हटले आहे?

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शासनातर्फे महिला सशक्तीकरण मेळावा मराठवाडा सांस्कृतिक मंडळ येथे आयोजित करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमात महिलांना उपस्थित राहता यावे यासाठी स्कूल बस वाहनचालकासह उपलब्ध करून देण्यात याव्यात. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रणात व मार्गदर्शनाखाली होत असल्याने आपण आपल्या शाळेच्या स्कूल बस ६ ऑक्टोबर रोजी वाहनचालकासह उपलब्ध करून द्याव्यात, असे पत्रात म्हटले आहे.

Sambhajinagar News: चालकांसह स्कूलबस द्या, शिक्षणाधिकाऱ्यांचा शाळांना फतवा
Sambhajinagar News : मद्यधुंद कार चालकाची तीन कारला धडक; पाचजण झाले फरार, संभाजीनगरातील घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com