Chhatrapati Sambhajinagar: अमृता फडणवीस यांच्या ट्विटरवर आ‌क्षेपार्ह कमेंट; माहिती मिळताच पोलिसांनी 'सीए'ला ठोकल्या बेड्या

Amruta Fadnavis News: अमृता फडणवीस यांच्याबद्दल एका ट्विटवर आक्षेपार्ह कमेंट करण्यात आली होती.
Amruta Fadnavis
Amruta FadnavisSaam TV
Published On

नवनीत तापडिया

Latest Cyber Crime News: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. त्यांच्या बिंधास्त स्वभावामुळे त्यांचे अनेक किस्से व्हायरल होतात. सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे जेथे सर्वच व्यक्ती व्यक्त होतात. मात्र यात कुणाच्याही भावना न दुखवणे गरजेचे आहे. अशात अमृता फडणवीसांवर अक्षेपार्ह कमेंट करण्यात आली आहे. (Latest Crime News)

सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी ट्रोल केलंच जातं. अमृता फडणवीस यांना देखील सोशल मिडीयावर ट्रोल करण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे. दरम्यान अमृता फडणवीस यांच्याबद्दल एका ट्विटवर आक्षेपार्ह कमेंट करण्यात आली होती.

Amruta Fadnavis
Amruta Fadnavis on Ajit Pawar: अजित पवारांना उद्देशून अमृता फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाल्या, 'कोण कुठे डोळा मारतंय...'

छत्रपती संभाजीनगर शहरातील एका 'सीए'ने ही कमेंट केली होती. ही कमेंट आता त्याला चांगलीच महागात पडली आहे. ट्विटवर कमेंट करताना अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्याचे लक्षात येताच शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. सायबर पोलिसांनी देखील तात्काळ सूत्र हलवत काही तासांत कमेंट करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले. अतिष ओमप्रकाश काबरा असे आरोपीचे नाव आहे.

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या स्वत: सुंदर गातात. यासह राजकीय घडामोडींवर देखील त्या आपले मत व्यक्त करतात. काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांना एका महिलेने धमकावून १ कोटी रुपयांची लाच ऑफर करण्याचा प्रयत्न केला होता.

Amruta Fadnavis
Amruta Fadnavis Post: अमृता फडणवीस यांनी गिरवले गायनाचे धडे; आशा भोसलेंकडून घेतल्या खास टिप्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com