Chhatrapati Sambhaji Nagar : गर्भलिंग निदान रॅकेट प्रकरण; दहावी नापास मुन्नाभाई गवारेचं मराठवाडाभर जाळं

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : गर्भलिंग निदानासाठी तो 55 हजार रुपये तर स्थानिक पातळीवर 30 ते 40 हजार रुपये दर आकारात होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आलीये.
Chhatrapati Sambhaji Nagar Crime
Chhatrapati Sambhaji NagarSaam tv
Published On

रामु ढाकणे, साम टीव्ही

अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात रॅकेटचे धागेदोरे छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, भोकरदन आणि आता थेट पुन्हा एकदा बीडपर्यंत पोहोचले आहेत. जानेवारी महिन्यात गेवराईमधून पोलिसांच्या हातून निसटलेला डॉ.सतीश गवारे हा छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सर्व गर्भपाताचे डॉक्टर आणि एजेंटच्या संपर्कात असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आलीय.

Chhatrapati Sambhaji Nagar Crime
Chhatrapati Sambhajinagar Crime: लॉजमध्ये थरार! डॉक्टर प्रेयसीच्या गळ्यावर वार, प्रियकराचाही आत्महत्येचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ

संपूर्ण मराठवाड्यावर त्याचे गर्भलिंगनिदानाचे जाळे असल्याची माहिती समोर आली असून आवश्यकतेनुसार तो गर्भलिंग निदानासाठी जात होता. इतकंच नव्हे तर दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन गर्भलिंग निदानासाठी तो 55 हजार रुपये तर स्थानिक पातळीवर 30 ते 40 हजार रुपये दर आकारात होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आलीये.

आरोपी डॉक्टराचा पोलिसांकडून तापास सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाइंड असलेल्या डॉ.सतीश सोनवणे आणि बोगस डॉक्टर सतीश गवारे हे दोघे एकमेकांचे नातेवाईक आहेत. डॉ. सतीश सोनवणेचा रेडिओलॉजिस्ट विषयाचा अभ्यास चांगला असल्याने याच बोगस गवारे डॉक्टरने त्याला 2020 मध्ये गर्भलिंगनिदानात सहभागी करून घेतले.

तेव्हापासून गवारे, सोनवणे आणि बीडची मनीषा सानप यांच्या मदतीने त्यांनी बीड आणि गेवराईमध्ये जाळे पसरवले होते. दरम्यान, धक्कादायक माहिती अशी की मूळ जालन्याचा असलेला डॉक्टर गवारे हा दहावी नापास आहे. मात्र स्वतःला एमबीबीएस सांगून तशी बनावट डिग्री देखील तो दाखवत होता. जून 2022 मध्ये गर्भपातादरम्यान एका महिलेच्या मृत्यूनंतर त्याचा हा कारभार उघडकीस आला होता. जानेवारी महिन्यापासून हा १० वी पास मुन्नाभाई अद्यापही फरार आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Crime
Chhatrapati Sambhajinagar News: केवळ एका मतासाठी; पठ्ठ्याने दुबईवरून थेट संभाजीनगर गाठलं, हजारो किमीचा प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com