Chhatrapati Sambhajinagar News: केवळ एका मतासाठी; पठ्ठ्याने दुबईवरून थेट संभाजीनगर गाठलं, हजारो किमीचा प्रवास

Lok Sabha Election 2024: लोकशाहीमध्ये एका मताची किंमत काय? असा प्रश्न नेहमी पडतो. तर एक व्यक्ती मतदान करण्यासाठी थेट दुबईवरून छत्रपती संभाजीनगरला आली आहे.
Chhatrapati Sambhajinagar News
Chhatrapati Sambhajinagar NewsSaam Tv

माधव सावरगावे छत्रपती संभाजीनगर

लोकशाहीमध्ये एका मताची किंमत काय? असा प्रश्न नेहमी पडतो. तर एक व्यक्ती मतदान करण्यासाठी थेट दुबईवरून छत्रपती संभाजीनगरला (Chhatrapati Sambhajinagar) आली आहे. थेट दुबईवरून मतदान करण्यासाठी मतदार संभाजीनगरमध्ये आल्याची घटना समोर आली आहे. आज चौथ्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणूक पार पडत आहे. तर मतदान करण्यासाठी मतदाराने दुबईहून छत्रपती संभाजीनगर गाठलं आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी थेट दुबईवरून एक मतदार दाखल झाला आहे. राकेश पाटील, असं या जागरूक मतदाराचं नाव आहे. मतदान करण्यासाठी राकेश पाटील दुबईहून छत्रपती संभाजीनगरला आले आहेत. त्यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको एन ३ या मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क (Voting) बजावला आहे.

राकेश पाटील हे मूळचे छत्रपती संभाजीनगरचे आहेत. पाटील मागील वीस वर्षांपासून दुबईत व्यावसायिक म्हणून राहतात. आपल्या एका मताचं महत्त्व लक्षात घेऊन राकेश पाटील यांनी दुबईवरून छत्रपती संभाजीनगर गाठलं. त्यानंतर आज मतदान (Lok Sabha Election 2024) केलं आहे. राकेश पाटील सध्या शहरात कौतुकाचा विषय ठरले आहेत. केवळ एका मतासाठी त्यांनी हजारो किमीचा प्रवास केला आहे. त्यांनी सर्वांना आपला मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं आहे.

Chhatrapati Sambhajinagar News
Lok Sabha Election 2024: आधी चंद्रपूरला आता तेलंगणात बजावणार मतदानाचा हक्क, एकाच निवडणुकीत दोनदा मतदान, ते कसं बरं?

राज्यात आज अकरा मतदारसंघांमध्ये मतदान आज पार पडत (Voter Come From Dubai) आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये आज 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 96 लोकसभा जागांवर मतदान होत आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश, बिहार, ओडिशा, झारखंड, आणि जम्मू-काश्मीर येथे मतदान होत आहे. अनेक ठिकाणी अत्यंत कमी प्रमाणात मतदान होत आहे.

Chhatrapati Sambhajinagar News
Ahmednagar Lok Sabha: अहमदनगरमध्ये सुजय विखे अन् निलेश लंकेंचे कार्यकर्ते भिडले; रस्त्यावर पडलेली ती पैशांची बॅग कुणाची? VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com