छत्रपती संभाजीराजे साधणार "मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जनसंवाद"!

याच मराठा आरक्षण मागणीच्या अनुषंगाने, छत्रपती संभाजीराजे २ आणि ३ जुलै रोजी बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत.
छत्रपती संभाजीराजे साधणार "मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जनसंवाद"!
छत्रपती संभाजीराजे साधणार "मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जनसंवाद"!विनोद जिरे
Published On

विनोद जिरे

बीड - मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सर्वच मराठा संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. छत्रपती संभाजी राजे भोसले Chhatrapati Sambhaji Raje यांनी देखील सरकारसमोर ७ मागण्या मांडल्या आहेत. याच मराठा आरक्षण मागणीच्या अनुषंगाने, छत्रपती संभाजीराजे २ आणि ३ जुलै रोजी बीड Beed जिल्हा दौऱ्यावर आहेत अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या Maratha Reservation वतीने बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे. Chhatrapati Sambhaji Raje to hold Public Dialogue on Maratha Reservation

हे देखाली पहा -

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर समाजामध्ये संतापाची लाट आहे.त्यामुळे समाज बांधवांशी संवाद साधन्यासाठी संभाजीराजे बीडमध्ये येत आहेत. ते अगोदर बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार असून त्यानंतर शहरातील समर्थ लॉन्स येथे, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर समाज बांधवांशी 'जनसंवाद' साधणार आहेत, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे. या दरम्यान बीडमध्ये संभाजीराजे काय बोलणार ? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com