Shocking News : हा कसला राग! शेतकऱ्याचे 60 कॅरेट टोमॅटो अज्ञाताने विहिरीत फेकून दिले; मन सुन्न करणारा VIDEO

Chhatrapati Sambhajinagar News : विकृत मानसिकतेतून एका व्यक्तीने शेतकऱ्याने तोडून ठेवलेले 60 कॅरेट टोमॅटो विहिरीत फेकून दिले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हा प्रकार घडला.

रामनाथ ढाकणे, छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विकृत मानसिकतेतून एका व्यक्तीने शेतकऱ्याने तोडून ठेवलेले 60 कॅरेट टोमॅटो विहिरीत फेकून दिले. यामुळे शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला कठोर शिक्षा करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्याने केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिल्लेगाव परिसरात हा प्रकार घडला आहे. येथील एका शेतकऱ्याने शनिवारी 60 कॅरेट टोमॅटो तोडून शेतात ठेवले होते. रविवारच्या बाजारात या टोमॅटोला चांगला भाव मिळेल, या आशेने शेतकरी घरी गेला.मात्र, अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री शेतात जाऊन 60 कॅरेट टोमॅटो विहिरीत फेकून दिले.

आरोपी इतक्यावरच थांबला नाही. त्याने टोमॅटोसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची गोणी आणि इतर साहित्य देखील विहिरीत फेकून दिले. रविवारी पहाटे तक्रारदार शेतकरी शेतात गेला असता हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे सदरील शेतकऱ्याने संताप व्यक्त केला असून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com