नवनीत तापाडिया, साम टीव्ही
Chhatrapati Sambhaji Nagar News : मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संभाजीनगर येथील वाळूज औद्योगिक परिसरातील सिडको महानगरात एका खाजगी स्कूल बसला अचानक आग लागली. बस थांबल्यावर विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी आलेल्या पालकांनी सजगता दाखवत आग शमविल्याने मोठी दुर्घटना टळली. (Latest Marathi News)
हा धक्कादायक प्रवास आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास घडला. दरम्यान, पालकांनी चालकाला याची माहिती दिल्याने बसमधील ३० विद्यार्थ्यांना तातडीने खाली उतरवण्यात आलं. आग लागल्याचे लक्षात येताच घटनास्थळी गोंधळ उडाला. सुदैवाने सर्वच्या सर्व विद्यार्थी सुखरुप आहे. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हायरल व्हिडीओ (Viral Video) देखील समोर आला आहे.
नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथील बजाजनगर परिसरात असलेल्या एका खासगी शाळेची बस आज पहाटेच्या सुमारास विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाण्यासाठी निघाली. शहरातील वेगवेगळ्या परिसरातून या बसने जवळपास ३० विद्यार्थ्यांना घेतलं. दरम्यान, बस शहरातील सिद्धिविनायक विहार परिसरात आल्यानंतर बसमधून धूर निघत असल्याचं एका विद्यार्थ्याच्या पालकाच्या लक्षात आलं.
त्यांनी तात्काळ याची माहिती बस चालकाला दिली. यानंतर बसमधील महिला मदतनीस आणि इतरांनी विद्यार्थ्यांना धीर देत खाली उतरवले. योग्यवेळी विद्यार्थ्यांना बसमधून खाली उतरवल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, बसमधील विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आपले पाल्य सुखरुप असल्याचं पाहून त्यांनी सुटकेचा श्वास घेतला. बसमधील आग वेळीच आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.