Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये 'गब्बर'च्या पत्राने खळबळ; राजकीय नेत्यांसह पोलिसांच्या हत्याकांडाची धमकी

Sambhajinagar Gabbar Latter : प्रशासनाला कंटाळुन जन्मलेला 'गब्बर' असं या पत्रात म्हटलं आहे. सदर व्हायरल झालेल्या पत्रात बिडकीन पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांची नावे आहेत.
Sambhajinagar Gabbar Latter
Sambhajinagar Gabbar Latter Saam TV

गब्बर या चित्रपटात अक्षय कुमार भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची हत्या करून त्यांना भर चौकात लटकवतो. अगदी तशाच आशयाचे एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पत्रात छत्रपती संभाजीनगर येथील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची हत्या करणार, अशी धमकी देण्यात आली आहे. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

Sambhajinagar Gabbar Latter
Navi Mumbai Crime: संतापजनक! निर्दयी बापाने ५ महिन्यांच्या बाळाला जमिनीवर आपटलं; नवी मुंबईतील धक्कादायक घटना

स्वतःला गब्बर सांगणाऱ्या या व्यक्तीने ' रिश्वत मत लेना वरना गब्बर आये जायेगा' असा उल्लेख पत्रात केला आहे. जिल्ह्यातील बिडकीन आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या वरिष्ठ आणि भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांना कंटाळून एका अज्ञात व्यक्तीने पोलिस महासंचालकांना हे पत्र लिहलं आहे.

पत्रात नेमकं काय म्हटलं आहे?

प्रशासनाला कंटाळुन जन्मलेला 'गब्बर' असं या पत्रात म्हटलं आहे. सदर व्हायरल झालेल्या पत्रात बिडकीन पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांची नावे आहेत. तसेच काही नेत्यांची देखील नावे घेतलेली आहेत. तर काही लोकांना इशारा देखील देण्यात आलेला आहे.

भ्रष्ट अधिकाऱ्यांना बजावून सांगण्यात यावे की "रिश्वत मत लेना वरना गब्बर आ जायेगा". सर्व गावगुंडांना लवकरात लवकर समज देण्यात यावा. अन्यथा होणाऱ्या हत्याकांड खूप भयंकर असतील व त्याला महाराष्ट्र गृह विभाग व पोलिस प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा देण्यात आला आहे.

मी पत्रात नाव घेतलेल्या गावगुंडांना राजकारण्यांना कायद्याच्या चौकटीत राहावे असा आपण समज द्यावा अन्यथा आम्ही लवकरच यांचं शरद मोहोळ आणि गजू तौर करू, अशी धमकी देखील अज्ञात व्यक्तीने पत्रातून दिली आहे.

भविष्यात मला जरी पकडून आपण जेलमध्ये टाकले किंवा माझ्या जीवाचं बरं वाईट कोणी गावातील गावगुंड यांनी केलं तर माझी टीम ही पूर्ण भारतभर पसरलेली आहे ते याचा बदला जरूर घेतील हे आपण लक्षात ठेवावे, असंही पत्रात लिहलं आहे.

यानंतर जर संपूर्ण जिल्ह्यामध्ये कुठेही अन्याय अत्याचार घडला आणि पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी त्या आरोपींना वाचवण्याचा किंवा पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर आमची गँग त्यांचा ताफा RPG लॉन्चरने आणि AK47 ने उडवून टाकेल, असा इशाराही या पत्रातून देण्यात आलाय.

मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नसून माझा कुठल्याही पक्षाशी तसेच संघटनेशी संबंध नाही. माननीय पोलीस महासंचालक साहेबांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी. माझ्या केसाला जर धक्का लागला तर पालकमंत्री संदिपान भुमरे यांना आम्ही जिवेच मारु. त्यामुळे माझी सुरक्षा ही तुमची जबाबदारी आहे, असंही पत्रात मांडण्यात आलंय.

Sambhajinagar Gabbar Latter
Nagpur Hit And Run Case : हिट अँड रन प्रकरणात धक्कादायक खुलासा; सासऱ्याच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर सूनेचा डोळा, ड्रायव्हरला सुपारी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com