Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये शालेय विद्यार्थ्यांना विषबाधा; चिमुकल्यांसाठी पालकांचा जीव कासावीस

Food Poisoning Of School Student: विद्यार्थ्यांवर शहरातील चिरायू चिल्ड्रन्स हॉस्पीटल या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळालीये.
Chatrapati Sahuji Nagar
Chatrapati Sahuji NagarSaam TV
Published On

Chhatrapati Sambhaji Nagar News:

छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळेतील जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. शाळेलीत 40 विद्यार्थी आणि 2 शिक्षकांना भोजनातून विषबाधा (Food Poisoning) झाली आहे. शालेय समितीने या घटनेकडे दुर्लक्ष केले असून सरकारकडून शाळेची मान्यता रद्द असल्याची माहिती मिळाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Chatrapati Sahuji Nagar
Mumbai Local Train Video: मुंबई लोकलमधून तरुणाचा जीवघेणा प्रवास; ऑफिसला पोहोचण्यासाठी दोन्ही डब्ब्यांमध्ये लटकला, खतरनाक VIDEO

छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा परिसरात असणाऱ्या युनिव्हर्सल हायस्कूलमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये विद्यार्थी (Students) आणि शिक्षकांना मध्यान्ह भोजन योजनेच्या आहारातून विषबाधा झालीय. या विद्यार्थ्यांवर शहरातील चिरायू चिल्ड्रन्स हॉस्पीटल या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळालीये.

शाळेतील दूषित पाण्यामुळे आणि शालेय पोषण आहारातून विषबाधा झाली असल्याती माहिती डॉक्टरांनी दिलीये. ही घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची असून याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी पालक करत आहेत. जेवण बनवताना त्यासाठी वापरण्यात येणारे धान्य आणि पाणी स्वच्छ असणे गरजेचे असते. अन्यथा नागरिकांना विषबाधा होते.

२९ शेतमजुरांना विषबाधा

४ ते ५ दिवसांपूर्वी जळगावच्या शिवरे येथे देखील अशीच एक घटना घडली होती. अशुद्ध पाणी पिल्याने २९ शेतमजुरांना विषबाधा झाली होती. या घटनेत एक वर्षाच्या बाळाला देखील पाण्याने विषबाधा झाली होती. पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर येथील शेतशिवारात शेतीकाम करण्यासाठी मध्य प्रदेशातील काही शेतमजूर कामासाठी आले आहेत.

शेतात काम करताना एका मोठ्या ड्रममधील दूषित पाणी प्यायल्याने त्यांना मळमळ आणि उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे त्यांना तामसवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे डॉ.चेतन पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार करून पारोळा कुटीर रुग्णालयात पाठविण्यातले होते. या सर्वांची प्रकृती देखील स्थिर असल्याचं डॉक्टरांनी त्यावेळी सांगितलं होतं.

Chatrapati Sahuji Nagar
Bhandara Crime News: क्रूरतेचा कळस! प्रेमातला अडथळा कायमचा संपवला; प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली भोळ्या पतीची हत्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com