उल्हासनगर : सिंधीबहुल शहर अशी ओळख असलेल्या उल्हासनगरात (Ulhasnagar) सिंधी नववर्षाच्या (New Year) पूर्वसंध्येला सिंधी (Sindhi) समाजाने बाईक रॅली काढली. उद्या सिंधी समाजाचा 'चेटीचंद' म्हणजेच नववर्षाचा सण असून त्याच्या पूर्वसंध्येला सिंधी बांधवांनी बाईक रॅली काढली. (chetichand festival in ulhasnagar)
उल्हासनगरच्या कॅम्प १ मधील रिजन्सी अँटिलिया पासून या बाईक रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर उल्हासनगरमधील पाचही कॅम्पमधून ही बाईक रॅली काढण्यात आली. उद्या हिंदू नववर्ष नववर्षाला सुरुवात होत असून मराठी बांधवांमध्ये हा दिवस गुढीपाडवा (Gudi Padva) म्हणून साजरा केला जातो. तर सिंधी बांधवांमध्ये याच सणाला 'चेटीचंद' (Chetichand) म्हणून ओळखलं जातं.
सिंधी बांधवांचं नववर्ष चेटीचंद उत्सवानंतर (festival) सुरू होतं. उद्या असलेल्या चेटीचंद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज सिंधी समाजाने उल्हासनगरात बाईक रॅली काढत आनंद व्यक्त केला. या बाईक रॅलीमध्ये सिंधी समाजाचे महाराष्ट्रातील एकमेव आमदार असलेले उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी, सिंधी समाजाचे नेते महेश सुखरामानी यांच्यासह सिंधी संत आणि सिंधी समाजातील प्रतिष्ठित नागरिकांसह सर्वसामान्य सिंधी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.