Parbhani News: धक्का दिला, खटाखट कानफटात मारल्या, ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत तुफान राडा

Parbhani Gram Sabha Fight Video : परभणीतील राणीसावरगाव येथे झालेल्या ग्रामसभेत हाणामारी झालीय. येथील एक व्यक्ती आणि ग्रामसेवक यांच्यात झालेल्या वादानंतर मारहाणीची घटना घडलीय. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
Parbhani Gram Sabha Fight  Video
Chaos in Parbhani’s Ranisavargaon Gram Sabha – fight video goes viral on social mediasaamtv
Published On
Summary
  • राणीसावरगाव ग्रामसभेत प्रचंड गोंधळ आणि हाणामारी झाली.

  • मारोती वाघमारे यांनी ग्रामसेवकाशी वाद घातल्याने ही घटना घडली.

  • सरपंच पती आणि भावाच्या हस्तक्षेपाने वाद अधिक चिघळला.

  • या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत.

गावातील भांडण झालं तर नागरिक सरपंचाकडे न्याय मागतात. पण जेव्हा सरपंचाकडूनच मारहाण होत असले तर काय कराव? कोणाकडून न्याय मागावा? परभणीमधील गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगावातील ग्रामसभेत तुफान हाणामारी झालीय. ग्रामपंचायतीचे भाडे न भरण्यावरुन घेण्यात आलेल्या ग्रामसभेत सरपंच महिलेच्या पतीने शिवीगाळ आणि मारहाण केलीय.

Parbhani Gram Sabha Fight  Video
Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावर मुंबईच्या सराफा व्यापाऱ्याला लुटले, साडेचार किलो सोने आणि रोकड लंपास

राणीसावरगाव ग्राम पंचायत च्या ग्राम सभेतील हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झालाय. या मारहाणीप्रकरणी पिंपळदरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेत. हाती आलेल्या माहितीनुसार, या गावातील व्यक्ती ग्रामपंचायतीचं भाडे देत नव्हता. त्याच्याकडे भाडे मागण्यात आले तेव्हा त्याने ग्राम सेवकासोबत वाद घातला. त्यानंतर ग्रामसभा झाली. या ग्रामसभेत महिला सरपंचाबरोबर अरेरावी केली. त्यामुळे ग्रामसभेत गोंधळ उडाला. काही वेळानंतर महिला सरपंचाचे पती तेथे आला त्याने त्या व्यक्तीला मारहाण केली.

Parbhani Gram Sabha Fight  Video
Manoj Jarange : "सरकार दंगल घडवतंय" २९ ऑगस्टला मराठा आरक्षण आंदोलनाची मुंबईत धडक; दोन वर्षांच्या लढ्याचा निर्णायक टप्पा

ग्रामपंचायतीचे भाडे थकवणाऱ्या व्यक्तीचे नाव मारोती वाघमारे आहे. वाघमारे याने भाडे तर दिलेच नाही उलट ग्रामसेवकाबरोबर वाद घातला होता. त्यानंतर त्या गावात ग्रामसभा ठेवण्यात आली. मात्र या सभेतही त्याने महिला सरपंचासोबत अरेरावी केली. त्यानंतर सरपंच महिलेचा पती आणि त्यांच्या भावाने वाघमारे यांना जाब विचारला त्यावरून पुन्हा वाद पेटला.

त्यानंतर मारहाण झाली. या प्रकरणात दोन्ही गटाकडून परस्पर फिर्यादी देण्यात आल्या आहेत. यानुसार मारोती वाघमारे यांनी सरपंच पती माऊली जाधव व त्यांच्या भावा विरोधात ॲट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल केलाय. तर सरपंच सौ बबिता माऊली जाधव यांनी वाघमारे यांनी शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com