Bridge Collapse VIDEO : चंद्रपुरातील बल्लारपूरात मोठी दुर्घटना; रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाचा स्लॅब कोसळला

चंद्रपुरातील बल्लारपुरातील रेल्वे स्थानकावर पादचारी पुलाचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे.
Chandrapur news
Chandrapur news saam tv

Chandrapur News : चंद्रपुरात मोठ्या दुर्घटनेचं वृत्त समोर येत आहे. चंद्रपुरातील बल्लारपुरातील रेल्वे स्थानकावर पादचारी पुलाचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत प्रवासी पायी चालत असलेले १३ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, बल्लारपूर रेल्वे स्थानकावर रेल्वेचा पादचारी स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. प्रवासी पायी चालत असलेले १३ प्रवासी जखमी झाले आहेत. काजीपेठ पॅसेंजर स्थानकावर येणार असल्याने प्लॅटफॉर्मवर भरपूर प्रवासी होते. काही प्रवाशांना ओव्हरहेड वायरचा अतिउच्च दाबाचा स्पर्श झाल्याने त्यांना गंभीर इजा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

बल्लारपूर रेल्वे स्थानकाचे अधिकारी कर्मचारी या सर्व जखमी प्रवाशांना मदत करत आहेत. सध्या बल्लारपुरात रेल्वे स्थानक व ग्रामीण रुग्णालय परिसरात गर्दी आहे. या भागात आणखी अपघात व चेंगराचेंगरी टाळण्यासाठी पथक तैनात करण्यात आले आहे.

मध्य रेल्वेचे सीपीआरओ शिवाजी सुतार यांनी सांगितले की, आज सायंकाळी ५.१० वाजता नागपूर विभागातील बल्हारशाह येथे फूट ओव्हर ब्रिजच्या प्री-कास्ट स्लॅबचा काही भाग कोसळला. या घटनेत ४ जण जखमी झाले असून सर्वांना प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

रेल्वेकडून मदत जाहीर

रेल्वेने गंभीर जखमींना एक लाख रुपये आणि मध्यम जखमींना ५०,००० रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमी व्यक्तींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी उत्तम वैद्यकीय उपचार दिले जात आहेत, अशी माहितीही सीपीआरओंनी दिली आहे.

पादचारी पुलाच्या अपघातात शिक्षिकेचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकावर पादचारी पुलाचा स्लॅब कोसळल्याप्रकरणी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. संध्याकाळी 4.55 च्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत जखमी असलेल्या शिक्षिका नीलिमा रंगारी (48) यांचा मृत्यू झाला आहे. नीलिमा बल्लारपूर येथील रहिवासी आहेत. काही गंभीर जखमींना चंद्रपूर शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेल्वेने सध्या गंभीर जखमीना 1 लाख तर किरकोळ जखमींना 50 हजार रु. नुकसानभरपाई जाहीर केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com