Chandrapur News: चंद्रपुरात सामान्य निरीक्षकांनी घेतला निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा, नियोजन सभागृह येथे नोडल अधिकाऱ्यांची बैठक

Lok Sabha Election 2024: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 13-चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी सामान्य निवडणूक निरीक्षक, कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक आणि खर्च निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.
Chandrapur News
Chandrapur NewsSaam Tv

>> हिरा ढाकणे

Chandrapur News:

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 13-चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी सामान्य निवडणूक निरीक्षक, कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक आणि खर्च निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने सामान्य निवडणूक निरीक्षक लोकेशकुमार जाटव यांनी जिल्ह्यातील तसेच चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.

नियोजन सभागृह येथे निवडणुकीशी संबंधित सर्व यंत्रणा तसेच नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक जाटव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक सुजीत दास, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, सहायक जिल्हाधिकारी (आर्णी) सुहास गाडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, मनपा आयुक्त विपीन पालीवाल आदी उपस्थित होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Chandrapur News
Nilesh Lanke Resign: मोठी बातमी! निलेश लंके यांनी आमदारकीचा दिला राजीनामा

लोकेशकुमार जाटव म्हणाले, निवडणुकीसाठी मतदानाचे साहित्य घेऊन जाताना डिस्पॅच सेंटरमध्ये आवश्यक प्रमाणात मनुष्यबळ ठेवावे. तसेच संबंधित यंत्रणेतील अधिकारी व कर्मचा-यांना वैयक्तिक मॅसेज जाणे आवश्यक आहे. मतदान झाल्यानंतर ईव्हीएम गोळा करताना अतिशय दक्ष राहावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.  (Latest Marathi News)

Chandrapur News
Lok Sabha Election 2024: सत्तेत आल्यास सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देणार, काँग्रेसची मोठी घोषणा

यावेळी सादरीकरण करताना जिल्हाधिकारी गौडा यांनी, जिल्ह्याचा आढावा, मतदान प्रक्रियेमध्ये असलेले मनुष्यबळ व्यवस्थापन, अधिकारी-कर्मचा-यांचे प्रशिक्षण, साहित्य व्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था, मतदान यंत्र सुरक्षा व व्यवस्थापन, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, निवडणूक खर्च व्यवस्थापन, मतपत्रिका, पोस्टल बॅलेट, मतदार मदत केंद्र, तक्रार निवारण केंद्र, सी – व्हीजील ॲप, 85 वर्षांवरील व्यक्तींना तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या व्यक्तींना गृहमतदानाची सुविधा आदींबाबत निवडणूक निरीक्षकांना माहिती दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com