Chandrapur Bribe Case : बिल काढण्यासाठी कंत्राटदाराकडे ४ लाखाची मागणी; कार्यकारी अभियंत्याला लाच घेताना ताब्यात

Chandrapur News : चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे आणि त्याच्या दोन साथीदारांना चार लाखांच्या लाच प्रकरणी रंगेहात अटक करण्यात आली
Chandrapur Bribe Case
Chandrapur Bribe CaseSaam tv
Published On

चंद्रपूर : जलजीवन मिशन अंतर्गत २३ गावांमध्ये काम पूर्ण करण्यात आले होते. या झालेल्या कामांचे बिल मंजूर करण्यासाठी कंत्राटदाराकडून चार लाख रुपयांची मागणी केली. लाच स्वीकारताना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यासह दोन जणांना चंद्रपूर लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. या घटनेने चंद्रपूर जिल्हात परिषदेत खळबळ उडाली आहे. 

चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे आणि त्याच्या दोन साथीदारांना चार लाखांच्या लाच प्रकरणी रंगेहात अटक करण्यात आली. दरम्यान राज्य शासनाची जल जीवन मिशन ही योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत आहे. या अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा आणि जिवती या दोन तालुक्यात २३ गावांमध्ये कामे करण्यात आली. या कामाचे कंत्राट एकाच कंत्राटदाराला देण्यात आलेला होता. 

Chandrapur Bribe Case
Jalgaon Accident : आईला बोलून घरातून निघाला अन्; भरधाव गाडीने दुचाकीला उडविले, दोघांचा मृत्यू

कंत्राटदाराकडून एसीबीकडे तक्रार 

जिल्ह्यातील राजुरा आणि जिवती या दोन तालुकयातील २३ गावांमध्ये पूर्ण झालेल्या जलजीवनच्या कामांचे बिल काढण्यासाठी अभियंता हर्ष बोहरे याने कंत्राटदाराकडे चार लाखांची मागणी केली. तसेच त्याचा वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार याने वीस हजार रुपये मागितले. इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम देणे कंत्राटदाराला मान्य नसल्याने सदर प्रकाराची तक्रार संबंधित कंत्राटदाराने चंद्रपूर एसीबीकडे केली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. 

Chandrapur Bribe Case
Bus Accident : प्रवाशांनी भरलेल्या बसला डंपरची धडक; चालकामुळे मोठी दुर्घटना टळली, सातजण जखमी

रंगेहाथ घेतले ताब्यात 

ठरल्याप्रमाणे चार लाख वीस हजार रुपयांची ही रक्कम सुशील गुंडावार याने स्वीकारली. त्यातील चार लाख रुपये मतीन शेख नामक व्यक्तीच्या हाताने कार्यकारी अभियंता बोहरे याच्या घरी पाठविण्यात आली होती. याचवेळी एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी अभियंता बोहरे, वरिष्ठ सहायक गुंडावार आणि पैसे घरी पोचवणारा मतीन शेख या तिघांनाही अटक करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com