Chandrapur | ना टीव्ही... ना फॅन... तरीही शेतकऱ्याला आलं १ लाखाचं वीजबिल

महावितरणच्या भोंगळ कारभाराने जिवती तालुक्यातील रहिवासी त्रस्त
Mahavitaran
MahavitaranSaam tv

चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील जिवती तालुक्यात महावितरणकडून (Mahavitaran) ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीजबिले पाठवली जात आहेत. अशातच झोपडीवजा घरातील शेतकऱ्याला एक लाख रुपये वीजबिल आल्याने खळबळ उडाली आहे. या शेतकऱ्याच्या घरात केवळ 2 बल्ब असल्याने हा शेतकरी बिल कसे भरायचे या पेचात पडला आहे. (Chandrapur Marathi News)

Mahavitaran
Mumbai Rain Today : मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग; विक्रोळीत घरावर दरड कोसळली

महावितरणच्या भोंगळ कारभाराने जिवती तालुक्यातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. चुकीचे रिडींग व वाढीव बिल आल्यामुळे वीजग्राहकात संताप व्यक्त होतोय. कधी रिडींग न घेणे, कधी एव्हरेज बिले पाठवणे, मीटर बंद दाखविणे असे प्रकार केले जात आहेत. अत्यल्प पावसाने दुबार पेरणीचे संकट डोक्यावर असताना हे बिल भरायचे कसे, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय.

Mahavitaran
Big Breaking | चरणमाळ घाटात कांद्यानी भरलेला ट्रक उलटला

दुसरीकडे आलेले वीज बिल वेळेत न भरल्यास महावितरणकडून कनेक्शन तोडण्याचे प्रकार होत आहेत. जाब विचारल्यावर अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने यावर तातडीने उपाययोजना व्हावी, अशी ग्राहकांची मागणी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com