Big Breaking | चरणमाळ घाटात कांद्यानी भरलेला ट्रक उलटला

चरणमाळ घाटात अपघातांची मालिका सुरूच आहे.
Nandurbar Track Accident
Nandurbar Track AccidentSaaM Tv
Published On

नंदुरबार : महाराष्ट्र गुजरात सीमेजवळील चरणमाळ घाटात अपघातांची (Accident) मालिका सुरूच आहे. मध्यरात्री कांद्यानी भरलेला ट्रक तीव्र उताराच्या वळणावर पलटी झाल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे, तर चालक व सहचालक किरकोळ जखमी झाले आहे. सदर ट्रक पिंपळनेरहून नवापूरकडे कांदे घेऊन जात असताना अपघात झाला आहे. सोमवारी (4 जुलै) या ठिकाणी गुजरात परिवहन महामंडळाची एक बस दोरीत कोसळणार होती, परंतु चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी जीवित हानी टळली होती. (Nandurbar Track Accident News)

Nandurbar Track Accident
पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवा; मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

धुळे नंदुरबार या महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांच्या जवळ व महाराष्ट्रातून गुजरात मध्ये जाण्यासाठी कमी अंतराचा रस्ता म्हणून वाहन चालक याचा वापर करतात. परंतू डोंगरदर्‍याच्या या रस्त्यात चरणमाळ गावाखाली असलेला घाट रस्ता अति तीव्र वळण उताराचा असल्याने मालवाहू वाहने अनियंत्रित होऊन अपघात होतात.

सदर घाट रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती करावी जेणेकरून अपघात टाळता येईल अशी मागणी केली जात आहे. (Nandurbar latest News)

Nandurbar Track Accident
शेतीच्या वादातुन महिलेचा खून; चार जण गंभीर तर ७ आरोपींना अटक

चरणमाळ घाट रस्त्यात अपघात झाल्यानंतर गाडीमधील मालाची लूट व्हायची. ही लूट थांबावी यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, नवापूर पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी बैठका घेऊन ग्रामसुरक्षा दल स्थापन केल्याने लूट थांबली आहे. तसेच अपघात होताच ग्राम सुरक्षा दलाच्या वतीने तत्काळ मदत केली जाते.

पोलीस विभागाने उपाय योजना केल्या असून सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील घाट दुरुस्तीकडे उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com