Chandrapur News: सेल्फीच्या नादात तरुण पाण्यात पडला, जीवलग मित्र मदतीसाठी धावले; पुढे जे घडलं ते भयानक

Chandrapur Breaking News: चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पर्यटनासाठी घोडाझरी तलाव परिसरात गेलेल्या ४ तरुणांचा तलावाच्या पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे.
Chandrapur Breaking News 4 Friends drowned in the lake while taking a selfie
Chandrapur Breaking News 4 Friends drowned in the lake while taking a selfieSaam TV

Chandrapur News Today: सध्या राज्यभरात पावसाच्या जोरदार सरी बसरत असून निसर्गरम्य वातावरण आहे. त्यामुळे अनेक नागरिक फिरण्यासाठी पर्यटनस्थळावर गर्दी करीत आहेत. अशातच चंद्रपूर (Chandrapur News) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पर्यटनासाठी घोडाझरी तलाव परिसरात गेलेल्या ४ तरुणांचा तलावाच्या पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे.

Chandrapur Breaking News 4 Friends drowned in the lake while taking a selfie
Wardha Crime News: वर्ध्यात संशयास्पद वस्तू सापडल्याने एकच खळबळ माजली, पोलिसांनी तपास केल्यास समोर आली भलतीच गोष्ट...

रविवारी (१६ जुलै) दुपारच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. मनीष श्रीरामे ( वय २६ वर्षे), धीरज झाडे (वय २७ वर्षे), संकेत मोडक (वय २५ वर्षे), चेतन मांदाडे (वय १७ वर्षे) अशी मृत तरुणांची नावे आहेत. या घटनेने हळहळ व्यक्त होत असून जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

प्राप्त माहितीनुसार, रविवारी दुपारच्या सुमारास काही तरुण नागभीड तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध घोडाझरी तलाव परिसरात फिरण्यासाठी आले होते. यातील काही युवक घोडाझरी तलावात मौज मस्ती करताना कॅनल परिसरात गेले. तिथे त्यांना सेल्फी काढण्याचा मोह झाला.

Chandrapur Breaking News 4 Friends drowned in the lake while taking a selfie
Bhayandar News: पाण्याचा अंदाज न आल्याने घडला अनर्थ! भाईंदर पश्चिमेच्या खाडीत MSFचा कर्मचारी बुडाला; शोधकार्य सुरू

सेल्फी घेत असतांना एक तरुण घसरून पडला. त्याच्यानंतर तीन युवक लागोपाठ घसरून पडले. उर्वरित इतर चौघांनी त्यांना वाचवण्याच्या प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस (Police) चंद्रपूर आप्पती व्यवस्थापन विभागाची टीम घटनास्थळी रवाना झाली.

पथकाने तातडीने बुडालेल्या तरुणांचा शोध सुरू केला. रात्री उशीरापर्यंत शोधमोहिम सुरू होती. मात्र, तरुणांचे मृतदेह सापडले नाहीत. घटनास्थळी नागभीड पोलीस स्टेशनचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित आहेत. एकाच दिवशी चार मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com