Wardha Crime News: वर्ध्यात संशयास्पद वस्तू सापडल्याने एकच खळबळ माजली, पोलिसांनी तपास केल्यास समोर आली भलतीच गोष्ट...

वर्ध्यात संशयास्पद वस्तू सापडल्याने एकच खळबळ माजली, पोलिसांनी तपास केल्यास समोर आली भलतीच गोष्ट...
Wardha Crime News
Wardha Crime NewsSaam Tv
Published On

>> चेतन व्यास

Wardha Crime News: वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील तळेगाव शहरातील एका डेली नीड्सच्या दुकानात डिटोनेटर्स सदृष वस्तू आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. बॉम्ब शोधक पथकही पाचारण झाले. मग, काय ती डिटोनेटर्स सदृश वस्तू चार्जेबल सेल अन् बॅटरी निघाली. अन् नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.

विशेष म्हणजे त्या वस्तूसोबत एक चिठ्ठीही मिळाली. चिठ्ठीत माया संग खाजू नको, दुकानासकट उडवण, असा मजकूर लिहून होता. एवढंच नव्हे तर तळेगाव परिसरात असलेल्या सी डेट या एक्स्पप्लोसिव्हि कंपनीकडून धमकी असल्याचही चिठ्ठीत लिहिले होते. त्यामुळे हे कृत्य कोणीतरी खोडसळपणाने केल्याची नोंद पोलिसांनी घेतली.

Wardha Crime News
DSP Salary in Maharashtra: पोलिस उपअधीक्षक झाल्यानंतर किती मिळतो पगार, कोणत्या मिळतात सुविधा? जाणून घ्या...

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास तळेगाव येथील दत्ता पुसदेकर हे नेहमीप्रमाणे त्यांच्या मालकीच्या डेली नीड्स दुकानात गेले. दुकानाचे शेटर उघडल्यावर शेटरच्यावरुन सुताने बांधून असलेलले दोन रिचार्जेबल सेल व एक मोबाईल बॅटरी संशयास्पद स्थितीत आढळली. त्यांनी लगेच याची माहिती पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक आशिष गजभिये यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठून संशयास्पद वस्तू ताब्यात घेतल्या. दुकान तळेगाव बस्थानका लगत असल्याने स्फोटके असल्याची चर्चा सुरू झाली. पाहता पाहता बघ्यांची गर्दी जमली. उलट सुलट चर्चेला पेव फुटले होते.  (Latest Marathi News)

संशयास्पद बस्तुची तपासणी करण्यासाठी बॉम्ब शोध पथकही पाचारण करण्यात आले. संशयास्पद वस्तूची तपासणी केली असता, ती स्फोटके नसल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी घटनेची नोंद करुन हे कृत्य खोडसळपणातून केल्याची माहिती दिली.

Wardha Crime News
Shinde-Fadnavis-Pawar Govt PC : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, पावसाची चिंता आम्हालाही आहे; CM एकनाथ शिंदेंची ग्वाही

विशेष म्हणजे २३ ऑगस्ट २०२२ मध्येही याच दुकानात असा प्रकार घडला होता. त्यावेळीही तळेगाव येथीलच सी डेट या एक्सप्लोसिव्ही कंपनीच्या नावे असलेल्या नळकांड्या व त्यात एक चिठ्ठी मिळून आली होती. एकाच व्यक्तीच्या दुकानात दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्यामुळे यामागील सूत्रधार कोण, याचा तपास पोलिस करणार का, असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com