Shivsena : एकनाथ शिंदेंचा शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया

एकनाथ शिंदे हळूहळू पंतप्रधान व्हायचं म्हणतील असा टोला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी लगावला आहे.
Uddhav Thackeray-Eknath Shinde
Uddhav Thackeray-Eknath ShindeSaam Tv
Published On

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आता शिवसेनेच्या (Shivsena) पक्षाध्यक्षपदावर दावा आहे. शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही बाब उघड झाली आहे. या दाव्यावर शिवसेनेकडून आता प्रतिक्रिया आली आहे. एकनाथ शिंदे हळूहळू पंतप्रधान व्हायचं म्हणतील असा टोला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी लगावला आहे.

Uddhav Thackeray-Eknath Shinde
Shivsena: एकनाथ शिंदेंचा थेट शिवसेना पक्षप्रमुख पदावरच दावा! निवडणूक आयोग काय निर्णय घेणार?

धनुष्यबाण हा आमचाच आहे, आम्ही अभिमानाने छातीवर मिरवतो. निवडणूक आयोग पण आमची मागणी मान्य करेल. एकनाथ शिंदे हळूहळू पंतप्रधान व्हायचं म्हणतील, मग त्यावेळी देवेंद्र फडणवीस काय करतील? पैशांच्या जोरावर ते संघटना फोडत आहेत, असा आरोप चंद्रकांत खैरेंनी केला आहे. (Latest Marathi News)

सगळं काही मला मिळावं असं काही करू नये. अघोरी विद्येने सर्वकाही मिळवण्याचा प्रयत्न करू नये. तुम्ही काहीही करायला लागले मग आम्हाला राग येणार नाही का? अशी विचारणा चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.

फुटलेला गट शिवसेना होऊ शकतो का? - अरविंद सावंत

त्यांनी काय दावा केला हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? करायचं ते निवडणूक आयोग ठरवेल. पक्षातून फुटल्यापासून ते अनेक दावे करत आहे. फुटलेला गट शिवसेना होऊ शकतो का? असा सवाल खासदार अरविंद सावंत यांनी विचारल आहे. पक्ष म्हणजे आमदार-खासदार नव्हे, तर त्यांना निवडून देणारे शिवसैनिक देखील महत्वाचे आहेत. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोग काय भूमिका घेत हे पाहुयात, असंही त्यांनी म्हटलं.

Uddhav Thackeray-Eknath Shinde
Cloud Burst : माढ्यात ढगफुटी; कुर्डुवाडी - करमाळा रस्ता बंद

शिंदे गटाचा पक्षचिन्हावरही दावा

सुरुवातीला शिंदे गटाने विधीमंडळ पक्षातील एकूण सदस्यांपैकी दोन तृतीयांश सदस्य आपल्या सोबत असल्याचं सांगत आपल्याला शिवसेनेचं निवडणूक चिन्हं मिळावं असा अर्ज निवडणूक आयोगाकडे केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला आयोगाच्या नियमाप्रमाणे विहित नमुन्यात अर्ज करण्यास सांगितले. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला नोटीस बजावली. एकनाथ शिंदे गटाने सादर केलेल्या कागदपत्रांची मागणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली.

निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला ठाकरे गटाला कागदपत्रांच्या प्रतिलिपी देण्याचे आदेश दिले. मात्र, शिंदे गटाकडून अद्यापपर्यंत कोणतेही कागदपत्र मिळाले नसल्याचा ठाकरे गटाचा दावा आहे. त्यामुळे जोपर्यंत कागदपत्र मिळत नाहीत तोपर्यंत उत्तर कसे देणार? असा ठाकरे गटाचा सवाल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com