

सोलापूर रेल्वेस्थानकावर आज ५ तासांचा वाहतूक ब्लॉक
दुपारी १:१५ ते सायंकाळी ६:१५
सालोपुरातून सुटणाऱ्या काही गाड्या दुसऱ्या मार्गांवरून वळवणार
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून सोलापूर स्थानकावर सिग्नल कामांसाठी गुरुवारी रोजी ५ तासांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक गुरुवारी दुपारी १:१५ ते सायंकाळी ६:१५ या कालावधीत हा ब्लॉक राहणार आहे. यामुळे सोलापूर विभागातील अनेक गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे.
सोलापूर स्टेशनच्या स्टेबलिंग लाईन क्रमांक १ आणि २ कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक सिग्नल कामे होणार असल्याने हा ब्लॉक घेण्यात येत आहे. यामुळे काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.काही गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावणार आहेत. विजापूर-रायचूर पॅसेंजर (गाडी क्र. ५/०६६२), रायचूर -विजापूर पॅसेंजर (गाडी क्र. ५७६६१) या गाड्या वळवून होटगी मार्गे चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे होटगी-सोलापूर दरम्यानची सेवा उपलब्ध राहणार नाही.
तसेच मुंबई- विशाखापट्टणम,पुणे-भुवनेश्वर, पंढरपूर-म्हैसूर,मुंबई-बंगळुरू उद्यान, कन्याकुमारी-पुणे व भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस या गाड्यांना ३० मिनिटांपासून ते १ तास १५ मिनिटांपर्यंत विलंब होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सिद्धेश्वर एक्स्प्रेसचं ५० व्या वर्षात पदार्पण
सिद्धेश्वर एक्स्प्रेस ही ८ एप्रिल १९७६ रोजी सुरू झाली. गेल्या पाच दशकांपासून सोलापूर ते मुंबई दरम्यान हजारो प्रवाशांची सेवा ही एक्स्प्रेस करत आहे. ही गाडी सुमारे ४५५ किलोमीटर अंतर केवळ ८ तासांत पूर्ण करते. पूर्वी नॉन-एसी आणि डिझेल इंजिनवर धावणारी ही गाडी आता आधुनिक LHB डबे आणि WAP-7 इलेक्ट्रिक इंजिनसह अधिक वेगवान आणि सुरक्षित झाली आहे.
सोलापूर, पुणे, दौंड, कल्याण, ठाणे अशा महत्त्वाच्या स्थानकांना जोडत ही गाडी प्रवाशांसाठी सर्वाधिक विश्वासार्ह पर्याय ठरली आहे. व्यावसायिक, नोकरदार आणि भाविकांसाठी ही ‘ओव्हरनाइट’ सेवा अत्यंत सोयीची विशेषतः सिद्धेश्वर यात्रा काळात या गाडीचे महत्त्व अधिक वाढते. ५० वर्षांचा प्रवास पूर्ण करत सिद्धेश्वर एक्स्प्रेस आजही सोलापूर आणि मुंबईला जोडणारी खरी ‘जीवनवाहिनी’ ठरत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.