Crime : 'त्या' निलंबीत पोलीसाची अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यास मारहाण

या तिघांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा विद्यार्थी मयुर सोळुंके याला मारहाण केली हाेती.
crime news, aurangabad , student
crime news, aurangabad , studentsaam tv

- नवनीत तापडिया

Aurangabad Crime News : तीन दिवसांपुर्वीच निलंबित करण्यात आलेल्या पाेलीस (police) कर्मचा-याने रात्रीच्या सुमारास एका विद्यार्थ्याला (student) मारहाण केली. या प्रकरणी संबंधित विद्यार्थ्याने केलेल्या तक्रारीनंतर पाेलीसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

आठ दिवसांपूर्वी क्रांतीचौक पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याचे शर्ट पकडून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करण्याऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास तीन दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी सेवेतुन निलंबीत केले होते. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी मध्यरात्री १ वाजता त्याच पोलीस कर्मचाऱ्याने आकाशवाणी चौकात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यास मित्रांच्या मदतीने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.

crime news, aurangabad , student
Shirdi : शिर्डीच्या साई बाबांचं मंदिर 'या' तारखेस दर्शनास रात्रभर खूलं

या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. साहेबराव बाबुराव ईखारे असे निलंबित पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याचा मित्र पंकज पाटील आणि रवी चंद्रकांत जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या तिघांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा विद्यार्थी मयुर सोळुंके याला मारहाण केली हाेती.

crime news, aurangabad , student
Chanwad : विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी अखेर चार डॉक्टरांवर गुन्हा दाखल

शहरात पाच गुन्हे दाखल

निलंबित पोलीस कर्मचारी साहेबराव ईखारे याच्या विरोधात जिन्सी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये बलात्कार, २०१९ व २०२२ मध्ये मारहाण, जवाहरनगरमध्ये २०१८ मध्ये मारहाण आणि क्रांतीचौक (aurangabad) ठाण्यात शासकीय कामकाजात अडथळ्याचा गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. याशिवाय ईखारेच्या इतरही कारनाम्याची चर्चा पोलीस दलामध्ये करण्यात येते.

Edited By : Siddharth Latkar

crime news, aurangabad , student
Lonavala Crime News : फुस लावून मुलास नेलं पळवून; लोणावळ्यात गुन्हा दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com