Nashik News : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल; नाशिकमध्ये खळबळ

Case filed against famous builder : नरेश कारडा यांनी निवृत्त कर्नल यांना फ्लॅट विकत देण्याचे सांगितले होते. त्यासाठी त्यांनी ३० लाख रुपये घेतले होते. मात्र त्यांना कोणताही फ्लॅट देण्यात आलेला नाही.
crime
Nashik NewsSaam TV

तबरेज शेख

Nahik News :

नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. निवृत्त कर्नल यांच्याकडून ३० लाखांची रक्कम घेऊन त्यांची फसवणूक केली असा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

crime
Nashik: लासलगावसह नाशकातील बाजार समितीचे कांदा लिलाव ठप्प; हमाली, तोलाई, भराई कपातीचा निर्णय लांबला

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नरेश कारडा यांनी निवृत्त कर्नल यांना फ्लॅट विकत देण्याचे सांगितले होते. त्यासाठी त्यांनी ३० लाख रुपये घेतले होते. मात्र त्यांना कोणताही फ्लॅट देण्यात आलेला नाही. तसेच त्यांचे पैसे देखील परत करण्यात आले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच निवृत्त कर्नल यांनी पोलिसांत धाव घेतली. उपनगर पोलिसांत निवृत्त कर्नल राकेश कालिया यांनी तक्रार केल्यावर पोलिसांनी या प्रकरणी कारडांवर गुन्हा दाखल केला आहे.

यापूर्वी कारडांवर तीन गुन्हे दाखल झाले आहेत. तर पोलिसठाण्यात शंभरहुन अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. कारडा यांनी आत्तापर्यंत जवळपास ६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. नरेश कारडा नाशिकमधील बांधकाम व्यावसायातील मोठं नाव आहे. मात्र त्यांच्यावर सातत्याने अशा पद्धतीच्या कारवाया समोर येतायत.

गेल्या वर्षी देखील एका प्रकरणात नरेश कारडा यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी १ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच शहर आर्थिक गुन्हेशाखेच्या पथकाने त्यांना अटक केली होती.

crime
Crime News: खळबळजनक! भरवस्तीत झालेल्या गोळीबाराने बुलढाणा, नाशिक हादरलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com