Dhule Accident: ६० फूट खोल नाल्यात कोसळली कार; वर्षाच्या पहिल्याच दिवशी २ जिवलग मित्रांचा मृत्यू

Dhule Accident : नवीन वर्षाचा पहिला दिवस शिरपूरकरांसाठी दु:खाचा ठरला. नाल्यात कार कोसळून दोन जिवलग मित्रांचा मृत्यू झालाय. यामुळे शहरात शोककळा पसरलीय.
Dhule Accident
Dhule AccidentSaam Tv
Published On

Car Fell Into 60 Feet Deep Canal:

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जात आहे. मात्र शिरपूर तालुक्यात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शोककळा पसरलीय. ५० ते ६० फूट खोल नाल्यात चारचाकी वाहन कोसळून झालेल्या अपघातात २ मित्रांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे खळबळ उडाली असून संपूर्ण शहरात दुखाचं वातावरण पसरलं. यात दोन्ही मित्रांचा जागीच मृत्यू झाला. (Latest News)

सकाळी रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या काही वाहन चालकांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने खड्ड्यात उतरून या वाहनाची तपासणी केली. त्यावेळी या वाहनामध्ये दोघा जणांचे मृतदेह नागरिकांना आढळून आले. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण शिवाजीराव पाटील (वय ४२) आणि प्रशांत उर्फ पप्पू राजेंद्र भदाणे (वय ३४) असे दोघा मित्रांची नावे आहेत. हा अपघात इतका भीषण होता कारचा पूर्ण चुराडा झाला होता.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेची माहिती शिरपूर शहरात वाऱ्याप्रमाणे पसरली व या दुर्घटनेमुळे एकच हळहळ देखील व्यक्त केली जात आहे. शिरपूर चोपडा रस्त्यावर तांडे शिवारातील जलयुक्त शिवार योजने अंतर्गत काम झाले आहे. तेथे 50 ते 60 फूट खोल नाला करण्यात आलाय. यात कार कोसळून अपघात झाला आणि यात दोन्ही मित्रांचा मृत्यू झाला.

नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात

नाशिक-मुंबई द्रुतगती महामार्गावरील पाचपाखाडी येथे एक भीषण अपघात झाला. बंद असलेल्या ट्रकच्या मागील बाजूस जीप धडकून हा अपघात झाला. घटनेत जीपमधील पाच जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर जवळत्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात नेमका कसा झाला याबाबत ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र जीप चालक दारू पिऊन वाहन चालवत असावा असावा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.

Dhule Accident
Mumbai-Nashik Expressway: नाशिक-मुंबई महामार्गावर ट्रक आणि जीपचा भीषण अपघात; ५ जण गंभीर जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com