cancel sindkhed raja to shegaon bhakti marg demands farmers
cancel sindkhed raja to shegaon bhakti marg demands farmers saam tv

Buldhana News : सिंदखेडराजा ते शेगाव भक्ती मार्गाला शेतक-यांचा विरोध, बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदाेलन

जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन तात्काळ हा भक्ती मार्ग रद्द करावा अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा शेतकऱ्यांनी प्रशासनास दिला.
Published on

Buldhana :

सिंदखेडराजा ते शेगाव (sindkhed raja to shegaon) या होऊ घातलेल्या भक्ती मार्गाला शेतक-यांनी विरोध दर्शविला हाेता. हा मार्ग रद्द करावा या मागणीसाठी आज (गुरुवार) शेतक-यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात (buldhana collector office) ठिय्या आंदोलन (aandolan) केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्य सरकारने सिंदखेडराजा ते शेगाव अश्या या भक्ती मार्गाची घोषणा केली आहे. त्या मार्गाचे सर्वेक्षण नुकतेच करण्यात आले आहे. या मार्गात येणा-या शेत जमिनी या सर्व पिकाऊ शेत जमिनी आहेत. येथे अल्पभुधारकाच्या जास्त शेत जमिनी येत आहे. भक्ती मार्ग झाला तर हजारो शेतकरी भूमिहीन होणार असल्याची भिती शेतकरी वर्ग व्यक्त करु लागला आहे.

cancel sindkhed raja to shegaon bhakti marg demands farmers
Buldhana : बुलढाणा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची तत्काळ बदली करा, निवडणूक आयाेगाकडे विराेधकांची मागणी; जाणून घ्या कारण

सिंदखेडराजा वरून शेगावला जाण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत म्हणून सिंदखेडराजा तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांनी या भक्ती मार्गाला सरळ सरळ विरोध दर्शवित आहेत. आज शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. (Maharashtra News)

जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन तात्काळ हा भक्ती मार्ग रद्द करावा अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा शेतकऱ्यांनी प्रशासनास दिला.

Edited By : Siddharth Latkar

cancel sindkhed raja to shegaon bhakti marg demands farmers
Advay Hire : ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांचा कारागृहातील मुक्काम वाढला, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com