Bus Fire News: मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अग्नितांडव; वऱ्हाडाची बस पूर्णपणे जळून खाक

Fire On Mumbai Pune Expressway: मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अग्नितांडव पाहायला मिळालं आहे. या आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
Bus Fire News
Bus Fire NewsSaam Tv

सचिन कदम साम टीव्ही, रायगड

मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अग्नितांडव (Bus Fire Video ) पाहायला मिळालं आहे. या आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या बसमधून लग्नाचे वऱ्हाड जात असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळ मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. बस पेटल्यानंतर प्रवाशी जीव वाचविण्यासाठी आरडाओरडा करत होते.

या आगीच्या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. 42 प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणूनच मोठा अनर्थ टळल्याचं म्हटलं आहे. रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळ ही आगीची (Bus Caught Fire On Mumbai Pune Expressway) घटना घडली होती. मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर बसने पेट घेतला होता. बस पेटल्यामुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

ही बस मुंबईहून सोलापूरकडे निघाली होती, अशी माहिती मिळत आहे. या बसमधून लग्नाचे वऱ्हाड जात असल्याची माहिती मिळत आहे. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच (Fire On Mumbai Pune Expressway) अग्निशमन दल, महामार्ग पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्था, डेल्टा फोर्सने घटनास्थळी धाव घेतली होती. या बसमध्ये 42 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. वऱ्हाडाची बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

Bus Fire News
Mumbai Reay Road Fire : मुंबईत अग्रितांडव! रे रोड परिसरातील गोदामाला आग, अग्निशमन दलाचे १० अग्निबंब घटनास्थळी

अग्निशमन दल, महामार्ग पोलीस, (Raigad News) अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्था, डेल्टा फोर्सच्या समयसुचकते बसमधील 42 जणांचे प्राण वाचले आहेत. ही आग आग शॉर्टसर्किमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु या अपघातात कोणतीही (Mumbai Pune Expressway) जिवीतहानी झालेली नाही. मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर बर्निंग बसचा थरार पाहायला मिळाला. या घटनेत बस पुर्णपणे जळून खाक झाला आहे.

Bus Fire News
Salman Khan House Firing: आरोपींना पकडण्यासाठी पोलीस बनले भाविक; हल्लेखोर मंदिरात झोपले होते बेसावध, घटनास्थळी नेमकं काय घडलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com