Buldhana : बकऱ्या चरायला घेऊन गेलेला तरूण घरी परतलाच नाही; रानात नेमकं काय घडलं?

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील काथरगाव येथे वीज कंपनीच्या निष्काळजीपणामुळे युवकाचा विद्युत धक्क्याने मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. संतप्त ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग 161 अडवून वाहतूक ठप्प केली आहे.
Buldhana : बकऱ्या चरायला घेऊन गेलेला तरूण घरी परतलाच नाही; रानात नेमकं काय घडलं?
Buldhana NewsSaam Tv
Published On
Summary
  • काथरगावात वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू, दोन जखमी

  • संतप्त ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग 161 अडवून वाहतूक ठप्प केली

  • अपघातानंतर वीज कंपनीचा अधिकारी घटनास्थळी अनुपस्थित

  • जखमींच्यावर अकोल्यातील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू

राज्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. अशातच बुलढाण्यातून धक्कदायक बातमी समोर आली आहे. विद्युत वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे संग्रामपूर तालुक्यातील काथरगाव येथील शेळ्या चारणाऱ्या युवकाचा विद्युत वाहिनीचा धक्का लागून मृत्यू झाला. या घटनेनंतर गावकरी आक्रमक झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार संग्रामपूर तालुक्यातील काथरगाव येथे वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे एका निरपराध युवकाचा विद्युत वाहिनीचा धक्क्याने मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दुपारी चारच्या सुमारास घडलेल्या या घटनेत उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीतील प्रवाह अचानक झाडावर उतरला आणि त्याच्या संपर्कात आलेल्या शेळ्या चारवणाऱ्या युवकाला प्रचंड धक्का बसला. त्याचा जागीच मृत्यू झाला.

Buldhana : बकऱ्या चरायला घेऊन गेलेला तरूण घरी परतलाच नाही; रानात नेमकं काय घडलं?
Buldhana : शेतातून घरी परतत असताना दुर्दैवी अंत; नदीत पाय घसरून तरुणाचा बुडून मृत्यू

त्याला वाचवण्यासाठी धावून गेलेल्या गावातील आणखी दोन जणांना देखील जोरदार विद्युत धक्का बसला. सध्या या दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अकोल्यातील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

Buldhana : बकऱ्या चरायला घेऊन गेलेला तरूण घरी परतलाच नाही; रानात नेमकं काय घडलं?
Buldhana Police : बुलढाण्यात लाखोंचा गुटखा जप्त; एलसीबीच्या टीम कडून एकाला अटक

या दुर्दैवी घटनेनंतर नागरिक संतापले आहेत. निष्काळजी वीज वितरण कंपनीवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करत गावकऱ्यांनी थेट हैदराबाद–बुरहानपूर–इंदौर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 जाम केला. गेल्या दीड तासांहून अधिक काळ या महामार्गावरील वाहतूक ठप्प आहे. शेगाव ते संग्रामपूर दरम्यान गाड्यांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Buldhana : बकऱ्या चरायला घेऊन गेलेला तरूण घरी परतलाच नाही; रानात नेमकं काय घडलं?
Buldhana Crime News : जुन्या वैमनस्यातून एकाची भररस्त्यात हत्या; रायपूर पोलिसांकडून तिघांना अटक

स्थानिक प्रशासनाने अनेक वेळा वीज वितरण कंपनीला झाडांमधून जाणाऱ्या विद्युत तारा सुरक्षित करण्याची सूचना केली होती, मात्र ती धाब्यावर बसवल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. दुर्घटनेनंतरही वीज वितरण कंपनीचा एकही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले नसल्यामुळे संताप आणखी वाढला आहे. यामुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

Buldhana : बकऱ्या चरायला घेऊन गेलेला तरूण घरी परतलाच नाही; रानात नेमकं काय घडलं?
Buldhana News : कॅन्सरग्रस्त महिलेला त्रास दिला, मुलीशी गैरवर्तन; शिवसैनिकांनी महाविद्यालयातील कर्मचाऱ्याला चोपला

या घटनेमुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातील वीज वितरण व्यवस्थेतील हलगर्जीपणा आणि देखरेखीतील त्रुटी समोर आल्या आहेत. अपघातानंतर मृतकाच्या घरावर शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. ग्रामस्थांचा आग्रह आहे की, जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत महामार्ग अडवून ठेवण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com