बुलढाण्यात शिक्षणाचा बट्ट्याबोळ, शिक्षिका गेल्या रजेवर, विद्यार्थी वाऱ्यावर; मुलांना शिकवतात रोजंदारावरच्या महिला

Buldhana Zilla Parishad Education System : तळागाळ्यातल्या मुलांपर्यंत शिक्षण पोहचावं. त्यांना शाळेचा लाभ मिळावा म्हणून प्रयत्न असल्याचा सरकार दावा करते. मात्र दुसरीकडे ग्रामिण भागात शिक्षणाची स्थिती धक्कादायक आहे.
Buldhana Shelud Women teach children at Zilla Parishad school
Buldhana Shelud Women teach children at Zilla Parishad school Saam Tv News
Published On

गिरीश निकम, साम टीव्ही

बुलढाणा : बुलढाण्यात शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत चक्क रोजंदारावरच्या महिला मुलांना शिकवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून नक्की काय प्रकार आहे.

तळागाळ्यातल्या मुलांपर्यंत शिक्षण पोहचावं. त्यांना शाळेचा लाभ मिळावा म्हणून प्रयत्न असल्याचा सरकार दावा करते. मात्र दुसरीकडे ग्रामिण भागात शिक्षणाची स्थिती धक्कादायक आहे. बुलढाणा जिल्ह्यात शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार समोर आलाय. इथं चक्क रोजंदारीवरच्या महिला मुलांना शिकवताना आढळल्या आहेत. हो तुम्ही ऐकताय ते खरं आहे. चक्क 200 रुपये रोजंदारीवर दोन महिला शाळेतील मुलांना शिकवतायत. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा हा प्रकार चिखली तालुक्यातील शेलूद येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील आहे. इथल्या दोन महिला शिक्षिका गेल्या वर्षभरापासून बाल संगोपनाची सुट्टीवर आहेत. अर्चना बाहेकर आणि शीला बाहेकर अशी शिक्षिकेची नावं असून त्यांनी आपल्या बदल्यात दोन महिलांना शाळेत शिकवायला ठेवलंय. स्वतःच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावं यासाठी दोन्ही शिक्षिका लातूरला गेल्याची तक्रार आहे.

Buldhana Shelud Women teach children at Zilla Parishad school
Raigad Crime : बोगस डॉक्टरचा कारनामा; गर्भपाताच्या गोळ्या दिल्याने महिलेला रक्तस्त्राव, प्रकृती चिंताजनक

या प्रकारामुळे बालसंगोपनासाठी मिळत असलेल्या रजेचा गैरफायदा समोर आलाय. जिल्ह्यात इतरत्रही असे प्रकार घडत असल्याचा संशय व्यक्त होतोय. गट शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशी करुन कारवाईचं आश्वासन दिलंय. शाळेत रोजंदारीवर महिला कार्यरत असताना शिक्षण विभागाचे वरीष्ठ गप्प का? शाळांची नियमीत तपासणी होत नाही का? असा सवाल पालक वर्ग विचारत आहे. कॉपीमुक्त अभियान ते पहिलीपासून सीबीएससी बोर्ड असे निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारने प्रथम जिल्हा परीषदेची शिक्षण व्यवस्था सुधारावी अशी अपेक्षा व्यक्त होतेय. शिक्षणमंत्री दादा भुसे या प्रकाराची दखल घेऊन काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

Buldhana Shelud Women teach children at Zilla Parishad school
Bhandara Crime : दोघांची घनिष्ट मैत्री, बायकोचं मित्रासोबत विवाहबाह्य संबंधाचा संशय, ग्रामपंचायत सदस्याला घरातच संपवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com