Buldhana Rain : बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले; वीज पडून ६ जनावरे दगावली

Rain Update Buldhana: राज्यात मागील दोन आठवड्यांपासून सातत्याने अवकाळी पाऊस होत आहे. रोज कोठे ना कोठे पाऊस होत असल्याने प्रचंड नुकसानीची झळ बसत आहे. तर आणखी काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली
Buldhana Rain
Buldhana RainSaam tv
Published On

बुलढाणा : राज्यात अवकाळी पावसाचा कहर सुरु आहे. या दरम्यान रविवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा, मेहकर, सिंदखेड राजासह इतर तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. दरम्यान काही ठिकाणी वीज पडल्याच्या घटना घडल्या असून बुलढाणा जिल्ह्यात वीज पडून सहा जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

राज्यात मागील दोन आठवड्यांपासून सातत्याने अवकाळी पाऊस होत आहे. रोज कोठे ना कोठे पाऊस होत असल्याने प्रचंड नुकसानीची झळ बसत आहे. तर आणखी काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून शेतकऱ्यांना शेत जमीन तयार करण्यात देखील अडचण येत आहे. यातच रविवारी सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. 

Buldhana Rain
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळेना; १६ दिवसांपासून शेतकऱ्याचे धरणे आंदोलन

उन्हाळी पिकांचे नुकसान 
बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर अद्याप कायम आहे. मागील आठवड्यापासून जिल्ह्यात भाग बदलत अवकाळी पाऊस पडत आहे. सोबतच विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आल्याने शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचे नुकसान सुद्धा होत आहे. काल सायंकाळी सुद्धा विजांच्या कडकडाटात तसेच वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. साखरखेर्डां परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने शेतातील नाल्या वाहू लागल्या. अनेक भागात उन्हाळी पिक अद्याप उभी असल्याने त्यांचे सुद्धा नुकसान झाले.

Buldhana Rain
Nashik Crime : चोरीच्या संशयातून गावकऱ्यांकडून तिघांना चोप; दिंडोरी खतवड येथील प्रकार, तिघे जखमी

सहा जनावरे दगावली 

बुलढाणा जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि विजांचा गडगडाट होत आहे. यामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. यातच वीज पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यात साखरखेडा परिसरात वीज पडून चार जनावरे तर खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी येथे  दोन जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे पशुपालक शेतकऱ्याचे नुकसान झाले असून पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी या शेतकऱ्याने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com