संजय जाधव
बुलढाणा : बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी भ्रष्टाचार केला असून त्यांच्या (Buldhana) कारभाराची चौकशी करावी. तसेच त्यांना निलंबित करण्याची मागणी करत शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाचे शहर प्रमुख मुन्ना बेंडवाल यांनी केली आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केला आहे. (Maharashtra News)
बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत त्यांच्या कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच त्यांचे निलंबन करण्यात यावे या मागणीसाठी शिंदे गटाचे शहर प्रमुख मुन्ना बेंडवाल यांनी संबंधित विभागासह आरोग्य मंत्र्यांकडे देखील तक्रार केली आहे. मात्र अजूनही कारवाई होत नसल्याने बेंडवाल यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सत्ताधारी पक्षच उपोषणाला
एखाद्या अधिकाऱ्यावर चौकशी करून कारवाई करण्यासाठी सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांना उपोषण करण्याची वेळ आली आहे. आरोग्य मंत्र्यांकडे मागणी करून देखील कारवाई होत नसल्याने राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला उपोषण करावे लागत असल्याने बुलढाण्यात हा चर्चेचा विषय ठरत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.