Rajmata Jijau Jayanti : राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी दीपोत्सव साजरा, राजवाडा झाला प्रकाशमय

Buldhana News: राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यात 12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला.
Rajmata Jijau Jayanti
Rajmata Jijau JayantiSaam Tv
Published On

Rajmata Jijau Jayanti :

सालाबादप्रमाणे याही वर्षी 11 जानेवारी 2024 रोजी राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यात 12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. संपूर्ण जिजाऊंचा राजवाडा अक्षरशः उजळून निघाला होता.

तसेच राजे लखुजी जाधव यांचा राजवाडा फुलांनी सजवण्यात आला. तर राजमाता जिजाऊ यांची प्रतिकृती रांगोळीद्वारे साकारण्यात आली आहे. राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी दीपोत्सव साजरा करताना शेकडो महिला उपस्थित होत्या.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rajmata Jijau Jayanti
Eknath Shinde News: 'ठाकरेंना फक्त पैशांशीच घेणंदेणं', अपात्रता निकालानंतर मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पहिलाच गंभीर आरोप

राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ प्रकाशमान झाले होते. शेकडो महिलांनी हातात मशाली घेऊन सिंदखेडराजा शहरातून रॅली काढली. याप्रसंगी महिलांनी जिजाऊ वंदना घेतली. तसेच जय जिजाऊ जय शिवराय, अशा गगनभेदी घोषणा दिल्या.  (Latest Marathi News)

पहिल्यांदाच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी या कार्यक्रमास आपली उपस्थिती लावली. दीपोत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंदखेडराजा शहर व परिसरातून तसेच राज्यभरातून मोठ्या प्रमाणात लोक येथे आले होते.

Rajmata Jijau Jayanti
Rajmata Jijau JayantiSaam Tv
Rajmata Jijau Jayanti
CET Exam News | सारथी, महाज्योती, बार्टी प्रवेश परीक्षा स्थगित; पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीवर नाशिककरांनी केले दिप महोत्सव

नाशिक श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौऱ्यानिमित्त नाशिकच्या गोदावरी नदीवर दीपोत्सवाचा आयोजन करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या रामकुंड परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. उत्तर परिसरातील मंदिरांना मुलांची सजावट करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या दुपारी गंगा गोदावरीची आरती होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com