Buldhana News : समृद्धी महामार्गावरील खासगी बसवर दगडफेक करणारे आरोपी सापडले; पोलिसांनी ४८ तासांतच शोधलं

Stone Pelting on Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरून दिग्रस ते मुंबईकडे जाणाऱ्या एका खासगी बसवर ७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री अज्ञातांनी दगडफेक केली होती.
Stone Pelting on Samruddhi Mahamarg
Stone Pelting on Samruddhi Mahamarg Saam TV
Published On

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या खासगी बसवर दगडफेक करणाऱ्या चार आरोपींना बुलढाणा पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अटक केली. रामनारायण दिगंबर चव्हाण, शुभम आटोळे, जावेद शेख आणि रवी शिरसाठ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैमनस्यातून आपण बसवर दगडफेक केली, अशी कबुली आरोपींनी दिली आहे.

Stone Pelting on Samruddhi Mahamarg
Weather Forecast : दसऱ्याच्या दिवशीच राज्यात कोसळणार तुफान पाऊस; मराठवाडा-विदर्भातील या जिल्ह्यांना यलो अलर्ट

विकासाचा मार्ग म्हणून ओखळला जाणारा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग उद्घाटनापासूनच चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून महामार्गावर सातत्याने अपघातांच्या घटना घडत आहेत. या घटना रोखण्यासाठी पोलीस आणि परिवहन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. एकीकडे अपघातांची संख्या वाढत असल्याने महामार्ग पोलिसांचं टेन्शन वाढलं असताना दुसरीकडे समृद्धी महामार्गावर दगडफेकीच्या घटना देखील घडत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावरून दिग्रस ते मुंबईकडे जाणाऱ्या एका खासगी बसवर अज्ञातांनी दगडफेक केली होती. ७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री ही घडली होती. या घटनेत खासगी बसची समोरील काच फुटून चालक आणि दोन प्रवासी जखमी झाले होते. दगडफेकीनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

याप्रकरणी बीबी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपी रामनारायण दिगंबर चव्हाण याला ताब्यात घेतले. त्याला खाकीचा इंगा दाखवताच पूर्व वैमनस्यातून आणि व्यवसायात झालेल्या आर्थिक नुकसानीतून दगडफेक केल्याची कबुली आरोपींनी दिली. यानंतर पोलिसांनी त्याच्या इतर तीन साथीदारांना देखील अटक केली आहे. घटनेचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.

Stone Pelting on Samruddhi Mahamarg
Mumbai Traffic Update : दसरा मेळाव्यानिमित्त मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल; या भागातील रस्ते आज राहणार बंद

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com