Buldhana News: भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! मलकापूर बाजार समिती सभापतींवर अविश्वास ठराव; निकालावेळी २ गटात राडा

Malkapur APMC Market Commitee News: मलकापूर बाजार समितीत सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्याच दोन गटांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. एका गटाने बाजार समितीच्या सभापतींविरोधात अविश्वास ठराव दाखल केला असून आज निकाल लागणार आहे.
Buldhana News: भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! मलकापूर बाजार समिती सभापतींवर अविश्वास ठराव; निकालावेळी २ गटात राडा
Malkapur APMC Market Commitee NewsSaamtv

संजय जाधव, बुलढाणा| ता. ३१ मे २०२४

मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीवर भारतीय जनता पक्षाचेच एका गटाने अविश्वासचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता त्याचा निकाल आज लागणार आहे. या निकालात काय होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले असून परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपच्या दोन गटांमधील वाद उफाळून आला आहे. मलकापूर बाजार समितीच्या संचालक निवडणुकीत भाजपने माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता मिळवली होती. मात्र आता याच संचालक मंडळात दोन गट पडले असून विद्यमान सभापती शिवचंद तायडे यांच्याविरोधात 13 विरुद्ध 4 असा अविश्वास चैनसुख संचेती गटाने दाखल केला आहे.

२१ मे रोजी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या या अविश्वास प्रस्तावावर आज निकाल लागणार आहे. हा निकाल ऐकण्यासाठी बाजार समिती परिसरात नागरिकांनी गर्दी केली असून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Buldhana News: भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! मलकापूर बाजार समिती सभापतींवर अविश्वास ठराव; निकालावेळी २ गटात राडा
Delhi Water Crisis: राजधानी दिल्लीवर पाणी टंचाईचे संकट! केजरीवाल सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय केली मागणी?

दरम्यान, यावेळी दोन्ही गट आमने सामने आल्याने बाचाबाची झाली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. सध्या परिसरात तणावाचे वातावरण असून दोन्ही बाजून घोषणाबाजी करण्यात येत आहे. त्यामुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Buldhana News: भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! मलकापूर बाजार समिती सभापतींवर अविश्वास ठराव; निकालावेळी २ गटात राडा
Nashik News: नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! ठाकरे गटाचे विद्यमान आमदार शिंदेंच्या संपर्कात?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com