Buldhana News: ज्ञानगंगा अभयारण्यात भरधाव दुचाकीच्या धडकेत बिबट्या गंभीर जखमी

ज्ञानगंगा अभयारण्यात भरधाव दुचाकीच्या धडकेत बिबट्या गंभीर जखमी
Buldhana News
Buldhana NewsSaam Tv
Published On

Buldhana News: एका भरधाव दुचाकीने रस्ता ओलांडत असलेल्या बिबट्याला जोरदार धडक दिली. यात बिबट्याला गंभीर दुखापत झाली आहे असून घटनस्थळावरून विना नंबरची केटीएम बाईक वन्यजीव विभागाने जप्त केली.

बुलढाणा - खामगाव मार्गावरील ज्ञानगंगा अभयारण्यातील जुना देव्हारी फाट्या जवळ घडली आहे. आज जखमी बिबट्याचा शोध सुरू असताना बिबट्याने एका वन कर्मचाऱ्यावर हल्ला करून त्याला जखमी केले आहे.

Buldhana News
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: 'कोण होतास तू, काय झालास तू', फडणवीसांचा ठाकरेंना टोला

मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव येथील दोन युवक केटीएम बाईकने खामगावच्या दिशेने भरधाव वेगात जात होते. याच वेळी ज्ञानगंगा अभयारण्यात रस्ता ओलांडत असलेल्या बिबट्याला त्यांनी जोरदार धडक दिली. यात बिबट्या गंभीर जखमी झाला तर दुचाकी रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात जाऊन पडली व दोन्ही युवक देखील जखमी झाले होते. (Latest Marathi News)

या घटनेची माहिती मिळताच बुलडाणा आरएफओ चेतन राठोड, वनपाल संजय राठोड व इतर वन कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी बिबट्या जखमी अवस्थेत दिसून आला तर केटीएम बाईक खड्ड्यात पडून होती. तसेच दुचाकी चालक त्या ठिकाणाहून निघून गेले होते. जखमी बिबट्याला पकडून उपचारासाठी बुलडाणा वनविभागाची रेस्क्यू टीम व पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलविण्यात आले.

Buldhana News
Pune Crime: MPSC पास तरुणीचा सडलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह! पुण्यात खळबळ; ८ दिवसांपासून...

परंतु बिबट्या आक्रमक होता व अशात रात्रीचा अंधार झाल्याने रेस्क्यू करणे शक्य नव्हते. म्हणून आज सकाळी जखमी बिबट्याला बेशुद्धचे औषध मारून बेशुद्ध करण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने बिबट्याला उपचारासाठी नागपूर येथील गोरेवाडा झू मध्ये रवाना करण्यात आले असून बिबट्याला धडक मारून जखमी करणाऱ्या दुचाकी चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती बुलडाणा आरएफओ चेतन राठोड यांनी दिली आहे.

आज सकाळी जखमी बिबट्याला शोधत असतांना आक्रमक बिबट्याने हल्ला चढविला यात प्रमोद रामदास राठोड वय 40 वर्ष रा.डोंगरखंडाळा हा कर्मचारी जखमी झाला असून आगोदर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात व नंतर एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com