Sindkhedraja News : गावात अवैध दारू विक्री; वडाळी येथील ग्रामस्थ झाले आक्रमक, महिलांची सिंदखेडराजा पोलीस स्टेशनवर धडक

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यामधील वडाळी या गावात अवैध दारू विक्री सर्रास सुरू आहे. सांगून देखील दारू विक्रेते ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. ते गावामध्ये गुंडगिरी करतात
Buldhana News
Buldhana NewsSaam tv
Published On

बुलढाणा : गावांमध्ये अवैधपणे दारूची विक्री केली जात आहे. त्यानुसार सिंदखेडराजा तालुक्यातील वडाळी येथील होत असलेल्या अवैध दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी असंख्य महिला ग्रामस्थांनी आज सिंदखेडराजा पोलीस स्टेशनवर धडक दिली आहे. गावात दारू विक्री बंद करण्याच्या मागणीचे निवेदन यावेळी पोलिसांना देण्यात आले आहे. 

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यामधील वडाळी या गावात अवैध दारू विक्री सर्रास सुरू आहे. दारू विक्रेत्यांना सांगून देखील दारू विक्रेते ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. ते गावामध्ये गुंडगिरी करतात व आमचे कोणी काहीच वाकड करू शकत नाही, असे सांगतात. कारण आम्ही पोलिसांना हप्ते देतो, त्यामुळे आम्ही कोणालाच घाबरत नाही असे म्हणून अवैध दारू विक्री करत आहेत.  

Buldhana News
Shahapur Police : अनोळखी तरुणाच्या हत्येचा उलगडा; प्रेम प्रकरणातून हत्या, पुरावा नसताना पोलिसांनी लावला छडा

ठराव करूनही दारू विक्री सुरूच 

गावामध्ये पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. आजूबाजूच्या गावातील मद्यपी दारू पिण्यासाठी गावात येतात व दारू पिल्यानंतर भांडणे जातिवाचक शिवीगाळ करतात. याचा वाईट परिणाम शाळकरी मुलांवर होत आहे. गावातील अल्पवयीन मुले सुद्धा नशेच्याअधीन गेले आहेत. गावातील जातीय सलोखा बिघडला असून गावातील अवैध दारू बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीने ठराव सुद्धा पारित केला आहे. तरी देखील दारू विक्री बंद झालेली नाही. 

Buldhana News
Bhandara Unseasonal Rain : वादळी वाऱ्यासह गारपीटीने भातपीक जमीनदोस्त; विजांच्या कडकडाटासह भंडाऱ्यात अवकाळी पाऊस

उपोषणाचा दिला इशारा 

पोलीस प्रशासनाकडे याबाबत तक्रारी दिल्यानंतर देखील पोलीस विभगाकडून दुर्लक्ष केले जात आहे. वडाळी येथील अवैध दारुविक्री तात्काल बंद करावी; अशी मागणी घेऊन संतप्त महिलांनी आज सिंदखेडराजा पोलीस ठाण्यावर धडक दिली आहे. गावातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ठाणेदार ब्रह्मानंद शेळके यांना निवेदन देण्यात आले. यानंतर देखील दारू विक्री बंद झाली नाही; तर उपोषणाचा इशारा महिलांनी दिला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com