Shahapur Police
Shahapur PoliceSaam tv

Shahapur Police : अनोळखी तरुणाच्या हत्येचा उलगडा; प्रेम प्रकरणातून हत्या, पुरावा नसताना पोलिसांनी लावला छडा

Shahapur News : उंबरखांड परिसरात मुंबई- नाशिक महामार्गालगत एक अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. ३० एप्रिलला हि घटना समोर आल्यानंतर तरुणाची हत्या करून फेकण्यात आल्याचा संशय पोलिसांना होता
Published on

फैय्याज शेख 
शहापूर
: मुंबई- नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील उंबरखांडजवळ महामार्गा लगत ३० एप्रिलला एक अनोळखी तरूणांची हत्या करून त्याचा मृतदेह या ठिकाणी फेकण्यात आल्याचे आढळून आले होते. मृतदेह जवळ कोणताही पुरावा नव्हता. हाती पुरावा नसताना शहापूर पोलिसांनी तपासाला सुरवात करत हत्येचा छडा लावत दोन संशयित आरोपीना ताब्यात घेतले आहे. 

शहापूर तालुक्यातील उंबरखांड परिसरात मुंबई- नाशिक महामार्गालगत एक अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. ३० एप्रिलला हि घटना समोर आल्यानंतर तरुणाची हत्या करून फेकण्यात आल्याचा संशय पोलिसांना होता. मृत तरुणाची कोणत्याही प्रकरणी ओळख नव्हती. केवळ हातावर देवाभाई असे गोंधलेले होते. यामुळे तरुणाची ओळख पटविण्यासोबत मृत्यूचे कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. 

Shahapur Police
Pune Accident: पुण्यातील नवले पुलाजवळ टेम्पोने दुचाकीला चिरडलं, महिलेचा मृत्यू; अपघाताचा थरारक VIDEO

प्रथम मृत तरुणाचा लावला तपास 

दरम्यान शहापूर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. स्वामी व पोलिस उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पथक तैनात करण्यात आले. शहापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाकडून तपासाला सुरुवात करण्यात आली. प्रथम या मृत व्यक्तीचा शोध घेतला. सदर मृत व्यक्ती ही नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील पांडूर्ली गावातील रहिवासी असल्याचे समोर आले. 

Shahapur Police
Akola : पोलीस भरतीचे स्वप्न अधुरे; सरावासाठी निघताना घडले दुर्दैवी, बूट घालताना कुलरचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

दोघांकडून हत्येची कबुली 

त्या अनुषंगाने पोलिस पथक मयत अशोक मधे (वय ३०) यांच्या पांडुर्ली गावी रवाना झाले. यानंतर त्याच्या घरी अधिक तपास केला असता याच गावातील वसीम बालम पठाण व राहूल संजय गुंजाळ या दोघा संशयितांना ताब्यात घेतले. यानंतर त्यांची कसून चौकशी केली असता सदर तरुणाची हत्या प्रेम प्रकरणातून करण्यात आली असल्याची कबुली त्यांनी दिली. पुढील तपास शहापूर पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com