अक्षय गवळी
अकोला : तापमानात प्रचंड वाढ होत असल्याने यातून दिलासा मिळावा यासाठी कुलरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. दरम्यान डेझर्ट पत्री कुलरमध्ये विद्युत प्रवाह उतरलेला असताना त्यास स्पर्श होऊन तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अकोला शहरात घडली आहे. या घटनेने परिवारावर मोठा आघात झाला आहे.
अकोल्यातल्या कान्हेरी सरप येथे ही घटना घडली आहे. रोहित विठ्ठल बावस्कर (वय १८) असे घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. उन्हाची तीव्रता वाढत आहे. रात्रीच्या वेळी देखील प्रचंड उकाडा आणि गरमी जाणवत आहे. असह्य होणाऱ्या झळांपासून सुटका मिळावी; यासाठी घरांमध्ये कुलरचा वापर केला जात आहे. प्रामुख्याने पत्री डेझर्ट कुलरचा वापर अधिक प्रमाणात होत असतो. घराच्या बाहेर हे कुलर लावले जात असतात.
पोलीस भरतीचा सराव
घटनेत मृत झालेला रोहित बावस्कर हा पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होता. दररोज पहाटे चार वाजता उठून पोलिस भरतीसाठी सराव करण्यासाठी बाहेर पडत होता. त्यानुसारच रविवारी देखील पहाटे चार वाजता नेहमीप्रमाणे पोलिस भरतीचा सराव करण्यासाठी रोहित झोपेतून उठला. यानंतर घराच्या बाहेर पडला असता रोहित पायात बूट घालत असताना त्याला कुलरचा जबर शॉक लागला. त्यात रोहितचा जागीच मृत्यू झाला.
आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू
दरम्यान, पत्री कुलर लावताना काळजी घेतली जात नाही. यामुळे विजेचा झटका बसून मृत्यू होण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. अशात अकोला जिल्ह्यात मागील वर्षात कुलरचा शॉक लागून जवळपास ९ जणांना मृत्यू झाला होता. या वर्षात कुलरचा शॉक लागून मृत्यू झाल्याची पहिली घटना समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांनी कुलर वापरताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.