शुभम देशमुख
भंडारा : राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट होत आहे. दरम्यान मागील सात दिवसांपासून भंडाऱ्यात वादळी वारा आणि गारपीटसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वादळामुळं हातातोंडाशी आलेले उन्हाळी भातपीक जमीनदोस्त झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
राज्यात एकीकडे उच्चांकी तापमानाची नोंद होत आहे. तर दुसरीकडे हवामान विभागाकडून अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यानुसार भंडारा जिल्ह्यात देखील वादळी वारा व गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. साधारण आठवडाभरापासून अवकाळी पाऊस होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे.
उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता
जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मागील आठ दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात अवकाळी बरसत आहे. मोहाडी, लाखांदूर आणि पवनी तालुक्यातील आसगाव परिसरातील शेतीला याचा सर्वाधिक फटका बसल्याचं चित्र बघायला मिळतं आहे. सध्या उन्हाळी भात पीक कापणीला आलेला असून वादळीवाऱ्यामुळं भात पीक अक्षरश: आडवा झाला आहे. भात पिकाच्या मळणीचा खर्च आता शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसणार असून उत्पादनातही मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली.
तात्काळ पंचनाम्याची मागणी
वादळी वारा आणि गारपीटमुळं भात पिकाची लोंबी गळाली असून शेत शिवारामध्ये पाणी साचले आहे. यामुळे भात पिकाचं उत्पादन घटणार आहे. या सोबतचं बागायती शेतकऱ्यांनाही या अवकाळीचा फटका बसला असून शेतकरी आर्थिक विवंचनेत अडकला आहे. महसूल विभागाने प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेत बांधावर जाऊन तातडीनं नुकसानीचे पंचनामे करावे आणि राज्य सरकारने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.