Crop Insurance : पिक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा; भरपाई म्हंणून दिले १९ रुपये, संतप्त शेतकऱ्यांचा ठिय्या

Buldhana News : पिकांचे नुकसान झाल्यानंतर विम्याची तुटपुंजी रक्कम दिल्याने पीक विमा कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या मांडला असून सर्व्हे फॉर्मसह विमा भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी केली आहे
Crop Insurance
Crop InsuranceSaam tv
Published On

बुलढाणा : पिकांना संरक्षण कवच म्हणून सरकारने पीक विमा योजना सुरु केली. मात्र या योजेत सहभागी शेतकऱ्यांची विमा कंपनीकडून थट्टा करण्यात आल्याचे समोर आले आहे. यात शेतकऱ्यांना भरपाई म्हणून विमा कंपनीकडून कुणाला १९ रुपये तर कुणाला ४० रुपये विमा मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना असून आज विमा कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. 

निसर्गाच्या लहरीपणात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी पीक विमा योजना सुरु करण्यात आली आहे. अर्थात या योजनेद्वारे पिकांना सुरक्षा कवच दिले जात आहे. मात्र विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना याचा मोबदला लवकर दिला जात असल्याचे अनेक तक्रारी आहेत. मात्र बुलढाणा जिल्ह्यात विम्याची अगदी तुटपुंजी रक्कम नुकसानीची भरपाई म्हणून देण्यात आल्याचे समोर आले आहे. 

Crop Insurance
Chikhali Crime : चिखलीत दोन गटात राडा; शिबिरात रक्तदान केल्याच्या कारणावरून उफाडला वाद

तुटपुंजी विमा रक्कम 

विमा कंपनीकडून अनेक शेतकऱ्यांना १९, ४०, ४४, ५२, ६०, ६३, १४८, २९ रुपये अशी भरपाई देऊन थट्टा करण्यात आली आहे. याबद्दल शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत असून काही शेतकऱ्यांना ६ एकराला १ लाख रुपये आल्याने हे नियम नेमके कसे?, हेक्टरी किती रुपये विमा मंजूर झाला? असा सवाल ही शेतकऱ्यांकडून केला जात आहे. विमा पीक विमा कंपनीने तुटपूंजी विमा नुकसान भरपाई देऊन चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांची बोळवण केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 

Crop Insurance
Jamner News : सासू, सासरे व पत्नीचा त्रास; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

चिल्लर जमा करत दिली विमा कंपनीला 

दरम्यान शेतकऱ्यांनी पीक विमा कार्यालयात ठिय्या मांडला होता. यावेळी संतापलेल्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या कार्यालयात आंदोलन दरम्यान कंपनीने दिलेली तुटपूंजी रक्कम चिल्लर स्वरूपात जमा केली. अनेक शेतकऱ्यांना पन्नास रुपयांपासून मदत मिळाली आहे. ती रक्कम सुद्धा संतापलेल्या शेतकऱ्यांनी कंपनीला परत करताना चिल्लर स्वरूपात आणून विमा नाकारत निषेध नोंदविला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com