Buldhana News: ग्रामसेवक गाढ झोपेत, मध्यरात्री इमारतीत अस्वल घुसलं; बुलडाण्यात नेमकं काय घडलं?

Bear Entering In Hostel Of Gram Sevak: बुलडाण्यातील ग्रामसेवकांच्या वसतिगृहामध्ये अस्वल घुसल्याची घटना घडली. तब्बल ८ तासांच्या प्रयत्नांनंतर वन विभागाला त्यांना रेस्क्यू करण्यात यश आले.
Buldhana News: ग्रामसेवक गाढ झोपेत, मध्यरात्री इमारतीत अस्वल घुसलं; बुलडाण्यात नेमकं काय घडलं?
Bear Entering In Hostel Of Gram SevakSaam Tv
Published On

संजय जाधव, बुलडाणा

बुलडाण्यातील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रातील वसतिगृहामध्ये अस्वल घुसल्याची घटना घडली. वसतिगृहाच्या इमारतीमध्ये अस्वल शिरल्याचे कळताच सर्वांची दाणादाण उडाली. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. तब्बल ८ तासांच्या प्रयत्नांनंतर अस्वलाला रेस्क्यू करण्यात वन विभागाला यश आले. अस्वलाला रेस्क्यू करून वन विभागाने त्याला अंबाबरवामध्ये नेऊन सोडले.

वन विभागाने अस्वलाला अंबाबरवा अभयारण्यामध्ये सोडले. मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा शहरातील जिल्हा कारागृहाच्या बाजूला असलेल्या ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या वसतिगृहामध्ये शुक्रवारी रात्री अस्वल शिरल्याची घटना समोर आली. घटनेची माहिती मिळताच परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. वसतिगृहाच्या बाजूलाच जंगल आहे. त्यामुळे या जंगलातूनच हे अस्वल याठिकाणी आले असल्याचे म्हटले जात आहे. याआधी देखील अनेकदा या वसतिगृह परिसरात अस्वल आढळून आले आहे.

Buldhana News: ग्रामसेवक गाढ झोपेत, मध्यरात्री इमारतीत अस्वल घुसलं; बुलडाण्यात नेमकं काय घडलं?
Buldhana crime News : धक्कादायक..खासगी शिकवणी वर्गात विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

शुक्रवारी रात्री ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेल्या चौकीदाराला वसतिगृहाच्या इमारतीमध्ये अस्वल शिरल्याचे दिसून आले. या वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ समयसूचकता दाखवत बिल्डिंगचे सर्व दरवाजे बंद करून दिले आणि याची माहिती वन विभागाला दिली. काही वेळातच बुलडाणा वन विभागाचे रेस्क्यू पथक ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात पोहोचले. सुरुवातीला अस्वलाला पिंजऱ्यात बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न अयशस्वी झाला. त्यामुळे मोठ्या शिताफीने वन विभागाच्या टीमने अस्वलाला डॉटच्या साहाय्याने सकाळी रेस्क्यू केले. त्यानंतर या अस्वलाला अंबाबरबा अभयारण्यात सोडले आहे.

Buldhana News: ग्रामसेवक गाढ झोपेत, मध्यरात्री इमारतीत अस्वल घुसलं; बुलडाण्यात नेमकं काय घडलं?
Buldhana Accident : बुलढाण्यात भरधाव एसटी बसने दुचाकीला उडवलं; दोघांचा घटनास्थळीच मृत्यू, एकजण गंभीर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com