संजय जाधव
बुलढाणा : संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस ४ डिसेंबरपासून विविध मागण्यासाठी बेमुदत संपावर आहेत. अंगणवाड्या बंद असल्यामुळे अंगणवाडीतील मुले शिक्षण व पोषण आहारापासून वंचित झाले आहे. बेमुदत संप पुकारल्याने मुलांना पोषण आहार कधी मिळेल हे सांगता येणे कठीण आहे. (Maharashtra News)
अंगणवाडीमध्ये 0 ते 6 वयोगटातील मुले अंगणवाडीमध्ये जातात व तीन ते सहा वयोगटातील मुलांना शिकवले जाते. या सर्व मुलांना अंगणवाडीमध्ये पोषण आहार दिला जातो. तसेच अंगणवाडी सेविकांना गरोदर मातानासुद्धा पोषक आहार दिला जात होता. आता झिरो ते तीन वयोगटातील मुलांना घरपोच आहार पुरविला जातो. अंगणवाडी सेविकांना गरोदर मातांना लसीकरण करून घेणे यांना आरोग्याच्या सर्व सुविधा देणे, गरोदर स्तनदा मातांच्या घरी जाऊन स्वच्छता आहाराविषयी आरोग्य विषयी मार्गदर्शन करणे, शासनाच्या योजनेची माहिती प्रत्येक घरामध्ये पोहोचविणे. तीन ते सहा वयोगटातील मुलांना इ आकारनुसार शिक्षण दिले जाते. अंगणवाडीतील मुलांचे प्रत्येक महिन्याला वजन उंची घेतले जाते. त्यानुसार कुपोषणाचा दर्जा कमी करण्याचे काम अंगणवाडी सेविकामार्फत केले जात होते. दर महिन्याला पोषण सुधारणेबाबत कार्यक्रम घेऊन महिलांना मार्गदर्शन केले जात होते.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या मागण्यासाठी बेमुदत संप
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना तुटपुंज मानधनावर काम करावे लागत आहे. सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना ग्रॅज्युटी व अंगणवाडी सेविका हे पद वैधानिक कर्मचारी म्हणून घोषित करावे. त्या अनुषंगाने येणारी वेतन श्रेणी भविष्य निर्वाह निधी द्यावा; असे सर्वोच्च न्यायालयाने शासनाला निर्देश दिलेले असताना सुद्धा शासन या निर्देशाची अंमलबजावणी करत नाही. तसेच अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मानधनात केंद्र शासन व राज्य शासन वाढ करत नाही. त्यामुळे महाराष्ट्रभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस बेमुदत संपावर गेल्या आहेत. गेल्यामुळे अंगणवाडीतील मुले गरोदर माता स्तनदा माता आहारापासून वंचित राहून कुपोषण वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे सरकारने या बेमुदत संपाची दखल घेण्याची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.