सुशील थोरात
अहमदनगर : अहमदनगर शहरातील माणिकनगर येथील डॉ. ऋषभ फिरोदिया यांच्या घरी घरफोडी करून (Ahmednagar) आरोपींनी तब्बल अर्धा किलो सोने म्हणजेच ५५० ग्रॅम सोने व रोख रक्कम घेऊन पसार झाले होते. त्या संदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात २८ ऑक्टोबरला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी तपास करत ३३ लाखांचे (Gold) सोने हस्तगत केले आहे. (Latest Marathi News)
अहमदनगरमध्ये झालेल्या या घरफोडीसंदर्भात पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार कोतवाली पोलीस (Police) ठाण्यातील पथकाने या गुन्ह्याचा कसून तपास केला. यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातून दीपक पवार या आरोपीला अटक करून त्याच्याकरून चोरीला गेलेले सोने हस्तगत करण्यात पोलिसांनी यश मिळवले आहे. सदर आरोपीची चौकशी केली असता घरफोडी केली असल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पोलीस पथकाला ३५ हजाराचे बक्षीस
दरम्यान कोतवाली पोलिसांनी आरोपी दीपक पवार याला राहुरी येथून अटक करून त्याच्याकडून तब्बल ३३ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. ही कारवाई कोतवाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या पथकाने केली आहे. कोतवाली पोलिसांनी केलेल्या या जलदगती तपासावर खुश होऊन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या तपास पथकाला ३५ हजार रुपयांचे रिवार्ड जाहीर केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.