
बुलढाण्यतील एका १६ वर्षीय मुलीला उपाचारासाठी फक्त २ तासात मदत मिळाली आहे. रसवंतीच्या मशीनमध्ये अडकून ही मुलगी गंभीर जखमी झाली होती. या मुलीच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून फक्त २ तासात मदत पोहचली आहे. यामुळे त्या मुलीचे प्राण वाचू शकले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तत्परतेमुळे हे शक्य झाले आहे. यामुळे मुलीच्या आईने देवेंद्र फडणवीसांचे आभार मानसे आहे.
याबाबत मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक म्हणाले की, रसवंती चालवत असताना मुलीचे केस अचानक त्या मशीनमध्ये गुंतले त्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यामुळे तिला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.गावकऱ्यांनी मुलीला जालन्यातली कलावती रुग्णालयात नेले. तिथे तिच्यावर उपचार सुरु कले.
या मुलीच्या औषधांच्या खर्चांची जबाबदारी समाजभान या सामाजिक संस्थेने घेतली. या घटनेची माहिती मुख्यमंत्री सहायता निधी कक्षापर्यंत पोहचली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुलीला मदत करण्याचे निर्देश दिले. अवघ्या दोन तासात या मुलीच्या उपचारासाठी १ लाख रुपयांची मदत मिळाली. या मुलीच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती बिकट होती. त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अवघ्या काही तासातच ही मदत पोहचवण्यात आली. उर्वरीत खर्च हा रुग्णालयाने उचचला.
बुलढाणाच्या या मुलीने खूप कमी वयात कुटुंबियांची जबाबदारी उचचली. तिने मोठ्या बहिणीला स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आणि भावाला शालेय शिक्षणासाठी प्रेरणा दिली. तिने स्वतः गावात रसवंतीगृहाचा व्यवसाय केला. तिचे केस अचानक त्या मशीनमध्ये गेले. त्यामुळे डोक्याला दुखापत, मेंदूवर सूज आली. यासाठी चार लाख रुपये खर्च होणार होता. मुख्यमंत्री सहायता निधीने केलेल्या मदतीनंतर रुग्णालय प्रशासनाने उर्वरित खर्च उचलला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.