Buldhana Crime News
Buldhana Crime NewsSaam Digital

Buldhana Crime News: बुलढाण्यात ट्रॅक्टर भरून गांजा जप्त, घटनास्थळी पोहोचल्यानंतर प्रकार पाहून पोलीसही चक्रावले

Buldhana Crime News: बुलढाणा जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत ट्रॅक्टर भरून गांजा जप्त केला आहे. लोणार तालुक्यातील हत्ता येथील एका शिवारात मोठ्या प्रमाणात गांजाच्या शेतीवर पोलिसांनी धाड टाकली आहे.
Published on

Buldhana Crime News

बुलढाणा जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईकरत ट्रॅक्टर भरून गांजा जप्त केला आहे. लोणार तालुक्यातील हत्ता येथील एका शिवारात मोठ्या प्रमाणात गांजाच्या शेतीवर पोलिसांनी धाड टाकत १ कोटी ४० लाख किंमतीचा १४ क्विंटल गांजा जप्त केला आहे. दुपारी १२ पासून सायंकाळी ६ पर्यंत ही कारवाई सुरू होती. याप्रकरणी अनिल चव्हाण याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणार तालुक्यातील हत्ता येथे मोठ्या प्रमाणात गांजाची शेती होत असल्याची माहिती खात्रीशीर सुत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज या ठिकाणी धाड टाकली. समोरच दृश्य पाहून पोलिसांचा विश्वासच बसत नव्हता. चक्क शिवारभर गांजाची शेती पिकवण्यात आली होती. पोलिसांनी तात्काळ संबंधित शेती मालकाला ताब्यात घेतलं आणि गांजीची रोपं शेतातून काढून ट्रॅक्टरमध्ये भरण्यात आली. चक्क गांजाने ट्रॅक्टरची एक ट्रॉली भरली होती. १४ क्विंटल गाजा सापडला आहे ज्याची अंदाजे किंमत १.४० कोटी आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी लाबरावं वाघ यांनी दिली

Buldhana Crime News
ATS Action On Information Leak: पाकिस्तानी गुप्तहेरांच्या हनीट्रॅपमध्ये अडकला नौदलाचा कर्मचारी, गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी ATS ने मुंबईतून केली अटक

दुपारी १२ वाजल्यापासून पोलीस या कामात गुंतले होते. सायंकाळी सहा पर्यंत ही कारवाई सुरू होती.आरोपी अनिल चव्हाण याला पोलिसानी ताब्यात घेतलं असून अमली पदार्थ विरोधी आणि औषधी पदार्थ कलम20 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याला न्यायालयात हजर केले असता 19 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. लोणार येथील ठाणेदार मेहेत्रे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Buldhana Crime News
Bhiwandi Crime News : अल्पवयीन मुलाला भांडण मिटवायला बोलावून घेतलं अन् घात झाला, खून करून मृतदेह खाडीकिनारी पुरला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com